नवी दिल्ली, 11 जुलै: देशात कोरोना व्हायरसची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत आहे. मात्र तरी देशावरील कोरोनाचं संकट अद्याप गेलेलं नाही. देशात कोरोनाव्हायरस संक्रमणासंदर्भात केलेल्या गणितीय अभ्यासानुसार, भारतातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली. मात्र रिप्रोडक्टिव्ह नंबर (R number) किंवा आर नंबरमध्ये एप्रिलच्या मध्यानंतर पहिल्यांदा पुन्हा एकदा संख्येमध्ये वाढ दिसून आहे. कोविड19 (Covid-19) चा संसर्ग किती वेगाने पसरतो हे सांगण्यासाठी आर क्रमांक एक प्रकारचा सूचक आहे. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून देशात सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आर नंबरला एक प्रकारचा गणितीय अंदाज देखील म्हटलं जाऊ शकतं. आधीच कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांच्या संपर्कात येऊन किती लोकांना संसर्ग झाला हे आर क्रमांक मोजते. हा आर नंबर जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कमी होत होता. मात्र 20 जूननंतर 7 जुलैपर्यंतच्या या कालावधीत त्यात झपाट्याने वाढ झाली. हेही वाचा- “बीजेपी विधायक ने मुझे थप्पड़ मारा”, यूपी पोलीस अधिकाऱ्याचा Viral Video चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सेसनं केलेल्या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. या संशोधनाचं नेतृत्त्व सीताभ्रा सिन्हा यांनी केलं आहे. असे दिसून आले की 20 जून ते 7 जुलै दरम्यान संपूर्ण देशाचे आर मूल्य 0.88 होते. हे आर मूल्य 15 मे ते 26 जून दरम्यान 0.78 होते. याचा अर्थ असा की प्रत्येक 100 संक्रमित लोकांचा गट आता सरासरी 88 लोकांना संक्रमित करत आहे. हेही वाचा- बैलगाडी पडल्यानंतर खिल्ली उडवणाऱ्या भाजपला भाई जगताप यांचं खरमरीत उत्तर अजूनही आर मूल्य 1 च्या खाली आहे. पण त्यात खूप वेगाने बदलही घडू शकतात. जर आर मूल्य 1 पेक्षा जास्त असेल तर असं मानले जातं की, संक्रमित व्यक्तीकडून एकापेक्षा जास्त लोकांना संसर्ग होत आहे. कोरोना प्रकरणात वाढ होण्याचे कारण हेच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.