ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी मावळ तालुक्यात प्रचार केला होता.
मावळ, 20 डिसेंबर : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहे. भाजपचे उमेदवार सर्वत्र निवडून आले आहे. पण, मावळमध्ये भाजपसोबत वेगळीच घटना घडली आहे. उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रचार केलेल्या गावातच भाजपचा पराभव झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी मावळ तालुक्यात प्रचार केला होता. आज मावळमधील ग्रामपंचायतीला निकाल लागला आहे. या निकालात निगडे गावात भाजपचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भिकाजी भागवत यांचा विजय झाला आहे. आतापर्यंत मावळ तालुक्यात राष्ट्रवादी 4 तर भाजप 1 ठिकाणी विजयी झाली आहे. तर चंद्रकांत पाटील यांनी भोयरे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा प्रचार केला होता. या ठिकाणी मात्र भाजप पुरस्कृत उमेदवार वर्षा अमोल भोईरकर विजयी झाल्या आहेत. मावळ ग्रामपंचायत 2022 मावळमध्ये 6 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या हाती आल्या आहेत तर 3 जाग्यावर भाजपाला समाधान मानावं लागलं 1) - देवले ग्रामपंचायत वंदना बाळू आंबेकर- सरपंच, राष्ट्रवादी 2) - कुणेनामा ग्रामपंचायत सुरेखा संदीप उंबरे- सरपंच, भाजपा 3) - इंदोरी ग्रामपंचायत शशिकांत राजाराम शिंदे- सरपंच, राष्ट्रवादी 4) - वरसोली ग्रामपंचायत संजय खांडेभरड- सरपंच, राष्ट्रवादी 5) - निगडे ग्रामपंचायत (भाजप नेते चंद्रकांत पाटील प्रचारासाठी आले तरी उमेदवाराचा पराभव) भिकाजी मुक्ताजी भागवत- सरपंच, राष्ट्रवादी 6) - सावळा ग्रामपंचायत मंगल नागु ढोंगे- सरपंच, राष्ट्रवादी 7) -भोयरे ग्रामपंचायत (चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केला होता उमेदवार विजयी) वर्षा अमोल भोईरकर- सरपंच, भाजपा 8) - गोडुंबरे ग्रामपंचायत निशा गणेश सावंत- सरपंच, भाजपा 9) - शिरगाव ग्रामपंचायत- बिनविरोध प्रवीण साहेबराव गोपाळे- राष्ट्रवादी