JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, प्रत्येक तासाला कोरोनाचे 3 नवे रुग्ण

पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, प्रत्येक तासाला कोरोनाचे 3 नवे रुग्ण

एकीकडे शासन आणि प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना पुण्यात वाढत असलेला कोरोनाग्रस्तांचा आकडा चिंतेची बाब ठरत आहे.

जाहिरात

देशभरातील ज्या शहरांतील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. त्यातच शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. आता मात्र यामध्ये काहीसा बदल होणार आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 18 एप्रिल : कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पुणे शहर हे कोरोनाचं केंद्र बनलं होतं. नंतर काळात कोरोनाबाधितांची संख्या कामी होत गेली. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. मागील 24 तासांत पुण्यात कोरोनाचे 74 नवे रुग्ण आढळले आहेत. पुण्यात काल दिवसभरात 59 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. तर पुन्हा रात्रीत आणखी 15 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे मागील 24 तासांतील कोरोनाबाधितांचा आकडा 74 वर पोहोचला आहे. मागील चार दिवसांचा विचार केला असता पुणे जिल्ह्यात 14 एप्रिलला 49 रुग्ण सापडले. त्यानंतर 15 एप्रिलला 63, 16 एप्रिल रोजी 60 आणि 17 एप्रिल रोजी 74 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मागील चार दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधितांचा आकड्यात सातत्याने वाढच होत असल्याचं दिसत आहे. एकीकडे शासन आणि प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना पुण्यात वाढत असलेला कोरोनाग्रस्तांचा आकडा चिंतेची बाब ठरत आहे. अजित पवार घेणार आढावा पुण्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज आढावा घेणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी दोन वाजता यासंबंधित बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुण्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नेमकी काय पाऊलं उचलली जातात, हे पाहावं लागेल. जगभरात काय आहे स्थिती? जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाख 40 हजारांहून अधिक झाली आहे. अमोरिकेमध्ये कोरोनाने थैमान घातले असून मृतांची संख्या वाढत आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या २२ लाखांव पोहोचली आहे. पाच लाख 50 हजारांहून अधिक जणांनी कोरोनावर केली मात केली आहे. तर एक लाख 47 हजार जणांचा कोरोनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या