पुणे, 17 जुलै : पुण्यातील कोंढवा परिसरात 11 जुलै रोजी एका सावकाराची निघृण हत्या (Pune murder) करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. घनश्याम उर्फ पप्पू पडवळ (वय 51) असे खून झालेल्या नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी लतिफ बाबू शेख (वय 43), शुभम प्रमोद कासवेकर (वय 24) आणि शुभम संतोष उबाळे (वय 22) या तिघांना अटक केली. यातील मयत व्यक्ती हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बारा गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. लतीफ शेख याने पप्पू पडवळ त्याच्याकडून चार वर्षापूर्वी व्याजाने पन्नास लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्याला आतापर्यंत दोन कोटी रुपये दिले होते. परंतु पप्पू पडवळ त्याच्याकडे आणखी 80 लाख रुपये मागत होता आणि पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे लतीफ याने पप्पू पडवळ याला ठार मारण्याचा कट रचला. त्यानंतर मौलानाकरवी उपचाराच्या नावे दोन मित्रांना घेऊन ते पडवळच्या घरी गेले. तिथे तिघांनी मिळून पडवळ याच्यावर कोयत्याने 50 ते 55 वार करीत त्याची निर्घृण हत्या केली होती. हेही वाचा- धक्कादायक! वडिलांनी 9 महिन्यांच्या चिमुकलीची पाण्याच्या ड्राममध्ये बुडवून केली हत्या दरम्यान, दोन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आणि तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना लतीफ याने पप्पू पडवळ यांच्याकडून पन्नास लाख रुपयाचे कर्ज घेतले असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने दिलेल्या माहितीत विसंगती आढळली. पोलिसांनी पुन्हा त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. लतीफने पडवळला पन्नास लाखाच्या बदल्यात दोन कोटी देऊनही तो आणखी 80 लाख मागत होता. तसेच लतीफ राहत असलेला फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी दबाव टाकत होता. लतीफ शेख यांच्या घरातील महिलांविषयी वाईट बोलत होता. त्यामुळे हा खून केल्याचे त्याने सांगितले.