खा. गिरीश बापटांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात येत्या काही महिन्यात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपकडून उमेदवारीसाठी काही नावं चर्चेत आहेत. पण कसब्यात मुक्ता टिळकांच्या निधनानंतर त्यांच्याच घरातील उमेदवार न देणं भाजपला महागात पडलं होतं. त्यामुळे बापटांनंतर त्यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.