JOIN US
मराठी बातम्या / पुणे / पुणे: ...अन् चाकू घेऊन फिरणाऱ्या मित्राची सटकली; एकाचा कापला कान तर दुसऱ्याला केलं रक्तबंबाळ

पुणे: ...अन् चाकू घेऊन फिरणाऱ्या मित्राची सटकली; एकाचा कापला कान तर दुसऱ्याला केलं रक्तबंबाळ

Crime in Pune: एका क्षुल्लक कारणातून तरुणानं आपल्या दोन मित्रांवर चाकूनं जीवघेणा हल्ला (Knife attack on friends) केला आहे. या हल्ल्यात दोन्ही मित्र जखमी झाले आहेत.

जाहिरात

एका क्षुल्लक कारणातून एका तरुणानं आपल्या मित्रांवर चाकूनं जीवघेणा हल्ला केला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 09 ऑगस्ट: एखाद्या मित्राला कधी आणि कोणत्या कारणावरून राग येईल, हे काही सांगता येत नाही. पुण्यात अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. एका क्षुल्लक कारणातून एका तरुणानं आपल्या मित्रांवर चाकूनं जीवघेणा हल्ला (Knife attack on friends) केला आहे. या हल्ल्यात दोन्ही मित्र जखमी (Injured) झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मित्र भूषण विलास कांडेलकर याला अटक (Accused arrest) केली आहे. या घटनेचा  पुढील तपास उत्तम नगर पोलीस करत आहेत. स्वराज राजेंद्र भोसले आणि समीर ढमाले असं हल्ला झालेल्या दोघा तरुणांची नावं आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास स्वराज आणि समीर हे पुण्यातील शिवणे परिसरातील सरडे बागेजवळ गप्पा मारत बसले होते. दरम्यान त्याठिकाणी त्यांचा मित्र भूषण चाकू फिरवत आला. सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, स्वराजनं भूषणला ‘तू चाकू घेऊन का फिरत आहेस, चाकूमुळं लहान मुलं घाबरतील’ असं म्हणाला. स्वराजनं केवळ चाकू घेऊन का फिरतोस? अशी विचारणा केल्यानं भूषणला राग आला. हेही वाचा- ‘Wait & Watch, एक के बदले चार मारके लेंगे’; नेत्याच्या हत्येनंतर गँगस्टरची पोस्ट रागाच्या भरात आरोपी भूषणने स्वराजला मारहाण करायला सुरुवात केली. ह्या अचानक सुरू झालेल्या भांडणात काही कळायच्या आत भूषणने स्वराजच्या डाव्या कानावर चाकूनं वार केला. यामुळे त्याच्या कानाला जखम झाली. आपल्या मित्रांची होणारी भांडणं पाहून समीर दोघांमध्ये मध्यस्थी करायला पुढे सरसावला. पण आरोपी भूषणने त्याच्यावरही हल्ला केला. भूषणने समीरच्या हनुवटीवर चाकूने वार करत त्यालाही जखमी केलं. हेही वाचा- गच्चीवर झोपलेल्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, चपलेमुळे झाला खुनाचा उलगडा ही घटना घडल्यानंतर दोन्ही जखमी मित्रांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात जाऊन मित्र भूषण विलास कांडेलकर (वय-31) याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी आरोपी भूषला अटक केली आहे. हल्ला करण्यामागच कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. केवळ चाकू घेऊन का फिरतोस? एवढंच विचारल्यामुळे मित्रांवर हल्ला केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या