मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'Wait & Watch, एक के बदले चार मारके लेंगे'; युवा नेत्याच्या हत्येनंतर गँगस्टरची धक्कादायक पोस्ट

'Wait & Watch, एक के बदले चार मारके लेंगे'; युवा नेत्याच्या हत्येनंतर गँगस्टरची धक्कादायक पोस्ट

हा गँगस्टर अभिनेता सलमान खान याची हत्या करण्यासाठी मुंबईत आला होता. तो लॉरेन्स गँगचा शार्प शूटर आहे.

हा गँगस्टर अभिनेता सलमान खान याची हत्या करण्यासाठी मुंबईत आला होता. तो लॉरेन्स गँगचा शार्प शूटर आहे.

हा गँगस्टर अभिनेता सलमान खान याची हत्या करण्यासाठी मुंबईत आला होता. तो लॉरेन्स गँगचा शार्प शूटर आहे.

अमृतसर, 8 ऑगस्ट : पंजाबमधील मोहाली भागातील मटोर येथे 7 ऑगस्ट रोजी भरदिवसा एका अज्ञात कारमध्ये आलेल्या चार हल्लेखोरांनी युवा अकाली दलाचे नेता विक्की मिट्टू (Vicky Middukhera) खेडा यांची गोळी घालून हत्या केली होती. या हत्येचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. अनेकांनी या हत्येचा निषेध केला जात आहे. विक्की सकाळी प्रॉपर्टी डीलरकडे आले होते. येथे आधीत हल्ला करण्याच्या तयारीत असलेले हल्लेखोर दबा धरून बसले होते. जसं विक्की बाहेर दिसला हल्लेखोरांनी ताबडतोब त्यांच्यावर हल्ला केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला.

मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी दहा वेळा फायरिंग केली होती. दरम्यान गँगस्टर संपत नेहरा (Sampat Nehra) याची फेसबुकवरील पोस्ट व्हायरल होत आहे. संपत नेहरा याने धक्कादायक पोस्ट केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये सूड उगवण्याचा इशारा दिला आहे.

काय लिहिलय त्या पोस्टमध्ये

तेरी मौत का बदला...! एक के बदले चार मारके लेगें...Wait and Watch...याशिवाय पोस्टमध्ये त्यांनी अनेक हॅशटॅग केले आहे आणि काहींना टॅगही केलं आहे.

" isDesktop="true" id="589748" >

कोण आहे संपत नेहरा?

संपत नेहरा हा गँगस्टर लॉरेन्सचा राइट हँड असल्याचं सांगितलं जात आहे. तो लॉरेन्स गँगचा शार्प शूटर आहे. जानेवारी 2016 मध्ये संपतला पहिल्यांदा बंदुकीचा धाक दाखवून कार लुटल्याच्या प्रकरणात अटक केली होती. यानंतर जून 2017 मध्ये साथी कैद्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकून फरार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार संपत नेहरा लॉरेन्स गँगच्या सांगण्यानुसार अभिनेता सलमान खान याच्या हत्येसाठी पाठवलं होतं. यासाठी संपत नेहरा मुंबईलाही पोहोचला होता.

विक्की मिट्ठू खेडा अकाली दलाचे नेते अजय मिट्ठू खेडा यांचे लहान भाऊ आहे. अजय मिट्ठू खेडा यांनी नुकताच माजी महापौर कुलवंत यांच्या मुलाविरोधात पालिका निवडणूक लढवली होती. 

First published:
top videos

    Tags: Crime news, Gang murder, Punjab