पुणे, 12 मे: मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांची ( Corona cases) संख्या झपाट्यानं वाढली आहे. परिणामी कोविडमुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही (Corona deaths) अचानक वाढलं आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दररोज सरासरी 100 हून अधिक रुग्णांवर अंत्यसंस्कार (funerals) करण्यात येत आहेत. त्यामुळे वैकुंठ स्मशानभूमी परिसरात सातत्यानं धुराचे लोट तयार होतं (Pollution rised in cemetery area) आहेत. याचा त्रास परिसरात राहाणाऱ्या स्थानिकांना होतं आहे. त्यामुळे स्मशानभूमीच्या अवैज्ञानिक व्यवस्थापनाविषयी चिंता व्यक्त करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील नवी पेठेतील रहिवासी विक्रांत धनंजय लाटकर यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. अजित विजय देशपांडे आणि अॅड. अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. कोविड साथीमुळे पुण्याच्या मध्यवस्तीत असणाऱ्या स्मशानभूमीत अचानक अंत्यसंस्कारांची संख्या वाढली वाढली आहे. याठिकाणी दररोज 100 पेक्षा अधिक प्रेतांचं दहन केलं जात आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होतं आहे. हा धूर मानवी आरोग्यासाठी घातक असून याचे वाईट परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर होताना दिसत आहेत. पुण्यातील नवी पेठ, सदाशिव पेठ, पर्वती पायथा, दांडेकर पुल, फाटक बाग परिसर, रामबाग कॉलनी, लोकमान्य नगर, विजयानगर कॉलनी, दत्तवाडी गावठाण, सारसबाग आदी परिसरात धुराचे लोट तयार होतं आहेत. वाचा - अजून मी मेली नाय! अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच आजीनं उघडले डोळे अलीकडेच नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलने (एनजीटी) पीएमसीविरूद्ध आदेश पारित करून, त्या आदेशात प्रदुषण रोखण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केले होते. पण एनजीटीचे नियम पाळण्यात पुणे महानगर पालिका सपशेल अपयशी ठरली आहेत. शव दहनाच्या प्रक्रियेतून पार्टिक्युलेट मॅटर (PM), सल्फर डायऑक्साइड (SO₂),नायट्रोजन ऑक्साईड्स (NO), अस्थिर सेंद्रिय संयुगे (VOC) यासारखे घातक वायू हवेत पसरत आहेत. परिणामी मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. वाचा - Salute! दिवसातले 8 तास PPE किट घालून मुंबईतले हे स्त्रीरोगतज्ज्ञ करतात रुग्णसेवा याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या संबंधित याचिकेत विविध मागण्या केल्या आहेत. याचिकाकर्त्याचं प्रतिनिधित्व करणारे अॅड. असीम सरोदे यांनी सांगितलं की, स्मशानभूमीतील चिमणी आणि इतर इलेक्ट्रिकल साधने अद्ययावत करावी. तसेच गॅस चेंबर्समधून धूर सोडण्याच्या व्यवस्थापनासाठी आणि चिमणीची उंची वाढवावी. याव्यतिरिक्त त्रैमासिक आधारावर एमपीसीबीमार्फत स्मशानभूमींतील वातावरणीय बदल, हवेचा दर्जा यावर देखरेख ठेवावी. त्यासाठी स्मशानभूमीच्या आसपासच्या परिसरात वास्तविक वायू प्रदूषण मीटर बसवावेत, अशा विविध मागण्या संबंधित याचिकेत केल्या गेल्या आहेत. याबाबतची सुनावणी 12 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.