डॉ. अमोल पवार हे नवरोसजी वाडिया प्रसूती रुग्णालयातील (Nowrosjee Wadia Maternity Hospita) प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि कोविड विरोधातल्या लढाईत अग्रभागी असेलेल्या भारतातील कोट्यवधी आरोग्य सेवेतील डॉक्टरांपैकी एक आहेत.
कोरोनाचे शेकडो रुग्ण या प्रसूती रुग्णालयात आलेले आहेत, त्यामुळे ज्यावेळी केसेस वाढू लागल्या तेव्हा गेल्या वर्षी मेमध्ये कोविड वॉर्ड सुरू करण्यात आला.
दिवसातून किमान आठ तास आणि आठवड्यातले सहा दिवस डॉ.पवार रुग्णालयात असतात. तर, 24 तास फोन कॉल करून रुग्णांच्या संपर्कात असता. डॉ. पवारांच्या दिवसाची सुरुवात राऊंड,रुग्णांची तपासणी, लसीकरण केंद्राला भेट देणे याने होते. ते व्हॅक्सिनेशनची नोंदणी आणि उर्वरीत साठ्याची माहिती घेत असतात.
डॉ. पवार म्हणतात, “कोरोना विरोधातली लढाईत आपल्याला अजून लढायतचीच आहे. पण, जेव्हा रुग्ण रुग्णालयमधून बरा होऊन जातो. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच हसू आणि समाधान पुन्हा लाढायची उमेद देतं”.