सचिन अंदुरेला घेऊन गेले, जिथे दाभोलकरांची झाली हत्या

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा पुढील तपास करण्यासाठी आज सीबीआयने सचिन अंदुरेला विठ्ठल रामजी शिंदे पुलावर नेऊन प्रत्यक्ष घटना कशी घडली हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.

पुणे, 31 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा पुढील तपास करण्यासाठी आज सीबीआयने सचिन अंदुरेला विठ्ठल रामजी शिंदे पुलावर नेऊन प्रत्यक्ष घटना कशी घडली हे जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. याच विठ्ठल रामजी पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती.आज सचिन अंदुरेला साडेतीन वाजता या पुलावर नेण्यात आलं. दाभोलकरांवर गोळ्या कुठून झाडल्या, त्यांना मारण्यासाठी ते कोणत्या दिशेने आले, कसे निघून गेले या सगळ्याची माहिती विचारण्यात आली. आणि पंचनाम्याद्वारे माहिती लिहूनही घेण्यात आली. सीबीआयचा, तपासाची पुढची बाजु पक्की करण्याचा हा प्रयत्न आहे.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा आता अखेर तपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. माॅर्निंग वाॅकलामपग गेलेल्या नरेंद्र दाभोळकर यांच्यावर गोळी कोणी झाडली? बाईकस्वार कोण होता? या प्रश्नांनी गेली ५ वर्षे तपास यंत्रणांची झोप उडाली होती. कितीही तपास चौकशा केल्या तरीही काहीच क्लू लागत नव्हता असं असताना नालासोपारा येथे स्फोटकांसह तिघांना अटक केली आणि नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा देखील उलगडा झाला.

कशी झाली डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या?शरद कळसकर यानं डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची रेकी केली होती. तेव्हा कोणत्या वेळेस कुठे जातात? कोणाला भेटतात? कोणत्या वेळेस एकटे असतात? कोणत्या वेळेस त्यांच्या आजूबाजूला कोण नसतं? या सर्वाची रेकी शरद कळसकर यानं केली होती. याच रेकीच्या आधारे शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी पहिल्यांदा डाॅक्टर नरेंद्र दाभोलकरांना मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रयत्न फसला.त्यानंतर २० आॅगस्ट २०१३ ला सकाळी डॉ.नरेंद्र दाभोलकर शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावरून जात होते. तेव्हा सात वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला त्यांच्या दिशेने बाईक चालवत शरद कळसकर आला होता आणि त्याच्या मागे बसला होता तो सचिन अंदुरे... याच सचिन अंदुरेने नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या आणि पळून गेले.पुढे जाऊन त्यांनी ठरल्या प्रमाणे या हत्येत वापरलेली बाईक, पिस्तूल आणि कपडे हे नष्ट करण्यासाठी दिले की यांनीच ते नष्ट केले याचा तपास आता एटीएस आणि सीबीआय करत आहेत.VIDEO : समुद्रात बुडणाऱ्या महिलेला सफाई कर्मचाऱ्यांनी वाचवलं

Trending Now