S M L

नालासोपारा स्फोटक प्रकरण : आव्हाडांसह चार लोक होते आरोपींच्या टार्गेटवर

नालासोपार स्फोटक प्रकरणात आज एटीएसने मुंबई सत्र न्यायालयात खळबळजनक माहिती उघड केली आहे.

Updated On: Aug 31, 2018 02:28 PM IST

नालासोपारा स्फोटक प्रकरण : आव्हाडांसह चार लोक होते आरोपींच्या टार्गेटवर

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 31 ऑगस्ट : नालासोपार स्फोटक प्रकरणात आज एटीएसने मुंबई सत्र न्यायालयात खळबळजनक माहिती उघड केली आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक केलेल्या 5 आरोपींच्या रडारवर आणखी चार लोकांची नाव असल्याची माहिती एटीएसनं न्यायालयासमोर दिली आहे. यात मुक्ता दाभोळकर, श्याम मानव, जितेंद्र आव्हाड आणि रितूराज ही मंडळी नालासोपारा आरोपींच्या टार्गेटवर असल्याचा दावा एटीएसने केला आहे.

दरम्यान, नालासोपारा स्फोटक प्रकरणाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंध असल्याने एटीएसच्या कोठडीत असलेल्या शरद कळसकर याची आणि सीबीआय कोठडीत असलेल्या सचिन अंदुरे याची समोरसमोर चौकशीसाठी सीबीआय प्रयत्न करतेय. सीबीआयनं मुंबईतील सेशन्स कोर्टाकडे यासाठी परवानगी मागितली आहे.

काल पुणे सीबीआय कोर्टाने अंदुरेची पोलीस कोठडी १ सप्टेंबरपर्यंत वाढवून दिली आहे. तर मुंबई सेशन्स कोर्टाने शरद कळसकरची पोलीस कोठडी ३ सप्टेंबरपर्यंत वाढवली. पण डॉक्टर दाभोलकर हत्याप्रकरणी त्याचा ताबा सीबीआयला देण्यास नकार दिला होता. त्यानंतर कळसकरला पुण्याला नेणं शक्य नसल्यानं आता अंदुरेला मुंबईत आणून कळसकरसोबत समोरासमोर चौकशी करण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे आणि त्यासाठीच ही परवानगी सीबीआयकडून कार्टाकडे मागण्यात आली आहे.

गौरी लंकेश आणि दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली गाडी ही एकच होती अशी माहिती आरोपी शरद कळसकर याने सीबीआयला दिली आहे. रविवारी सीबीआयने असा दावा केला होता की गौरी लंकेश आणि दाभोलकर यांची हत्या एकाच पिस्तूलाने करण्यात आली होती आणि आता त्यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली गाडीदेखील एकच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे नालासोपारा स्फोटक प्रकरणापासून ते औरंगबाद आणि नंतर जालनापर्यंत या प्रकरणाचे धागे-दोरे आता उघड झाले आहेत आणि त्यात आता या प्रकरणात नवीन नावं एटीएसने कोर्टासमोर सांगितली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2018 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close