JOIN US
मराठी बातम्या / पुणे / Pune News: कौतुकास्पद! आई-पत्नीचे दागिने गहाण ठेवून उभारलं कोव्हिड सेंटर, वास्तूला दिलं महाराजांचं नाव

Pune News: कौतुकास्पद! आई-पत्नीचे दागिने गहाण ठेवून उभारलं कोव्हिड सेंटर, वास्तूला दिलं महाराजांचं नाव

Pune Positive News: पुण्यातील रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पुण्यातील धानोरी याठिकाणी 53 बेडचं रुग्णालय उभारलं आहे. यासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे आणि आईचे दागिणे गहाण ठेवले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 05 मे: सध्या पुणे शहरासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona Pandemic) झपाट्यानं वाढत आहे. राज्यात दररोज जळपास 60 हजार नव्या रुग्णांची (Corona patients) वाढ होतं आहे. याचा प्रचंड ताण आरोग्य प्रशासनावर पडत आहे. परिणामी शासकीय रुग्णालये कोरोना रुग्णांनी पूर्ण भरली असून नव्याने कोरोना बाधित होणाऱ्या रुग्णांना बेडसाठी ओढाताण करावी लागत आहे. योग्य वेळी बेड किंवा वैद्यकीय सुविधा न मिळाल्यानं अनेकांचे हकनाक बळी जात आहे. अशातचं पुण्यातील एका तरुणाने ‘कोव्हिड योद्धा’ (Covid Warrior) नावाला साजेशी कृती केली आहे. रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण (Umesh Chavhan) यांनी पुण्यातील धानोरी याठिकाणी 53 बेडचं रुग्णालय उभारलं (Built covid hospital) आहे. हे रुग्णालय अवघ्या सात दिवसांत उभारलं असून त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे आणि आईचे दागिणे गहाण ठेवले आहेत. एकिकडे बेड मिळवण्यासाठी रुग्णांची आणि नातेवाईकांची वणवण सुरू असताना, त्यांनी उभारलेल्या या रुग्णालयाचं सर्व स्तरातून कौतुकं होतं आहे. त्यांनी या रुग्णालयाला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कोव्हिड-19 हॉस्पिटल असं नाव दिलं आहे. हे वाचा- ‘ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू म्हणजे नरसंहारच’,हायकोर्टाचे 48 तासांत चौकशीचे आदेश सकाळ ने याबाबत वृत्त दिलं आहे. याविषयी बोलताना उमेश चव्हाण म्हणाले की, राज्यात सध्या कोरोना रुग्णांची वाढ झपाट्यानं होतं आहे. अशात लोकांना बेड मिळत नाहीयेत. अशा स्थितीत कोरोना रुग्ण आजाराला घाबरण्यापेक्षा बेड आणि औषधाच्या तुटवड्याला जास्त घाबरत आहेत. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांच्या मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये अधिकचं भीतीचं वातावरण तयार होतं आहे. त्यामुळे आम्ही स्वतः चं रुग्णालय उभं केलं आहे. यासाठी अनेक अडचणी आल्या. ’ हे वाचा- भन्नाट Start-up Idea: रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यासाठी 2 पुणेकरांचा पुढाकार हे रुग्णालय उभं करण्यासाठी त्यांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तर त्यांनी त्यांच्या घरातील आईचे आणि पत्नीचे मिळून एकूण 35 तोळे सोनं गहाण ठेवून तीस लाखांची जुळवा जुळव केली आहे. लोकांची गरज लक्षात घेऊन त्यांनी अवघ्या सात दिवसांत 53 बेडचं हे प्रशिस्त कोव्हिड रुग्णालय उभं केलं आहे. कोरोनाच्या संकटकाळात त्यांच्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या