JOIN US
मराठी बातम्या / पुणे / आम्हाला पाडा अन् झाडांवर कुऱ्हाडी चालवा, सरकारविरोधात पुण्यातील नागरिकांचा संताप

आम्हाला पाडा अन् झाडांवर कुऱ्हाडी चालवा, सरकारविरोधात पुण्यातील नागरिकांचा संताप

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी चिपको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गोविंद वाकडे (पिंपरी चिंचवड), 31 मार्च : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी चिपको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील रावेत प्राधिकरण परिसरात असलेल्या सेक्टर 29 वरील पाच एकर भूखंडावर तीन करोड रुपये खर्च करून, पुणे महामेट्रो कडून तब्बल 1000 झाडांचे उद्यान उभारण्यात आलंय.

मात्र आता या उद्यानाशेजारी असलेल्या मोकळ्या भूखंडावर निवडणूक आयोगाच्यावतीने ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी मोठं गोडाऊन बांधलं जातंय. आणि याच कामात अडथळा ठरणारी सुमारे 200 देशी झाडे कापली जाणार आहेत, त्याचबरोबर उर्वरित 800 झाडांचं आणि विकसित झालेल्या या उद्यानातील पक्षी आणि जैव विविधता धोक्यात आली असल्याचं सांगत, या उद्यान परिसरातील नागरिकांनी झाडे तोडण्याला तीव्र विरोध केला आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानं चर्चेला उधाण

संबंधित बातम्या

निवडणूक आयोगातर्फे उभारण्यात येणाऱ्या बांधकामासाठी जास्तीचा FSI वापरून इमारत उंच केल्यास झाडे वाचतील हा पर्याय असल्याचे सांगण्यात आले आहे. तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग प्रस्तावित इमारत उभारण्यावर ठाम असून त्याचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे.

अशा परिस्थितीत झाडे तोडली जाणार असतील तर आधी आम्हाला पाडा आणि नंतर झाडांवर कुऱ्हाडी चालवा अशी टोकाची भूमिका घेत नागरिकांनी चीपको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.

शिंदे-फडणवीस सरकारला हायकोर्टाचा झटका; ठाकरे गटाच्या याचिकेवर निर्णय

दरम्यान , ज्या पुणे महामेट्रो   कडून 3 करोड रुपये खर्च करून हे इकॉ पार्क उभारल्या गेलय त्याची पुढील जबाबदारी आपली नसल्याचं सांगत मेट्रो ने देखील हात झटकल्याने  या शेकडो झाडांच्या  अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या