JOIN US
मराठी बातम्या / पुणे / आधी डोक्यात खुर्ची घातली मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात पोटच्या लेकांनी जन्मदात्या आईला दिल्या नरक यातना

आधी डोक्यात खुर्ची घातली मग लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात पोटच्या लेकांनी जन्मदात्या आईला दिल्या नरक यातना

Crime in Pune: आई आणि मुलाचं नातं जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं. पण पुण्यातील दोन नराधम तरुणांनी या नात्याला कलंक फासला आहेत.

जाहिरात

वयोवृद्ध आईच्या नावावरील संपत्ती बळवकण्यासाठी आरोपींनी जन्मदातीचा अमानुष छळ केला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 23 ऑगस्ट: आई आणि मुलाचं नातं जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं. पण पुण्यातील दोन नराधम तरुणांनी या नात्याला कलंक फासला आहेत. आपल्या वयोवृद्ध आईच्या नावावरील संपत्ती बळवकण्यासाठी (Beating mother for property) आरोपींनी जन्मदात्या आईचा अमानुष छळ (Inhuman Persecution of Mother) केला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी आपल्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण (2 men beat mother) करत तिला घराबाहेर काढलं आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी घरगुती हिंसाचारासह हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहे. मुन्नवर अब्बास अली नईमाबादी असं 57 वर्षीय पीडित महिलेचं नाव आहे. त्या गृहिणी असून पुण्यातील सिनेगाँग रोड परिसरातील गीता हाऊसिंग सोसायटीत वास्तव्याला आहेत. तर अहेमद अब्बास अली नईमाबादी (वय 39) आणि हुसेन अब्बास अली नईमाबादी (वय 32) अशी नराधम मुलांची नावं आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेची नणंद आणि दीर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींनी पीडित महिलेच्या नावावर असणारं घर बळकवण्यासाठी मागील काही काळापासून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. हेही वाचा- रात्रभर केली राखीची तयारी अन्..; पहाटेच्या कृत्यानं बहिणीला दिली आयुष्यभराची जखम आरोपींनी संपत्तीमधील आईचा हिस्सा काढून घेण्यासाठी हा छळ केला आहे. संपत्तीच्या हव्यासापोटी आरोपीनं आपल्या आईलाच नरक यातना दिल्या आहेत. तसेच कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आईनं सह्या कराव्यात, फ्लॅट नावावर करून द्यावा, यासाठी पीडितेच्या मुलांनी आणि इतर नईमाबादी कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण केली आहे. पीडित महिलेनं कोऱ्या स्टॅप पेपरवर सह्या करायला नकार दिल्यानं आरोपी मुलानं आईला खुर्ची फेकून मारली आहे. हेही वाचा- भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबासोबत अमानुष कृत्य; भरचौकात हातपाय बांधले अन्… या हल्ल्यात पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मुलाच्या हल्ल्यानंतर फिर्यादी नईमाबादी खाली कोसळल्या, त्यानंतर घरातील अन्य कुटुंबीयांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीत पीडित महिला गंभीर जखमी झाल्या असून त्या तशाच अवस्थेत जीव वाचवत त्या आपल्या भावाच्या घरी नाना पेठेत आल्या आहेत. सध्या त्या आपल्या भावाकडेच वास्तव्याला असून आरोपींनी पीडितेच्या घराला कुलूप लावून ते घर बळकावलं आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या