JOIN US
मराठी बातम्या / पुणे / कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंगत; मविआच्या 'त्या' निर्णयानंतर एकनाथ शिंदे भाजपसाठी पुण्यात

कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात रंगत; मविआच्या 'त्या' निर्णयानंतर एकनाथ शिंदे भाजपसाठी पुण्यात

एकीकडे रवींद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. तर दुसरीकडे टिळक वाड्याला डावलून रासने यांना तिकीट देण्यात आल्यानं ब्रह्मण समाज पक्षावर नाराज आहे, अशा परिस्थितीमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत.

जाहिरात

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 18 फेब्रुवारी :  भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे पुण्यातील कसबा विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.  भाजपकडून हेमंत रासने यांना तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने कसब्यात भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिंदे प्रचाराच्या रिंगणात    एकीकडे रवींद्र धंगेकर यांनी भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. तर दुसरीकडे टिळक वाड्याला डावलून रासने यांना तिकीट देण्यात आल्यानं पुण्यातील ब्रह्मण समाज देखील पक्षावर नाराज असल्यानं भाजपची कोंडी झाली आहे. त्यामुळे आता कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत निर्माण झालेली चुरस पाहात धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्व:ता कसबा पोटनिवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत. या पोटनिवडणुकीत कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे येत्या सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. तसेच ठाकरे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होऊ शकतो, अशी चर्चा आहे. हेही वाचा :  धनुष्यबाण मिळाल्यानंतर आता शिंदेंचा मोर्चा काँग्रेस, राष्ट्रवादीकडं; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट शरद पवारही करणार प्रचार   दरम्यान दुसरीकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे देखील प्रचारात सहभागी होणार आहेत. उमेदवारांनी सांगितलं मतदारसंघावर लक्ष असून द्या म्हणून आपण कसबा आणि चिंचवड मतदारसंघात जाणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. महाविकास आघाडीकडून शरद पवार निवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्यानं ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या