पोलीस ठाण्यात समर्थकांची गर्दी
पिंपरी -चिंचवड, 10 डिसेंबर : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली आहे. पोलिसांनी शाईफेक करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. मात्र आता शाईफेक करणाऱ्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. समर्थकांनी पिपंरी -चिंचवड पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे. मोठ्या संख्येनं आंदोलक पोलीस ठाण्यासमोर जमले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर आधी गुन्हा दाखल करा आणि नंतरच आमच्यावर कारवाई करा अशी मागणी शाईफेक करणाऱ्यांच्या समर्थकांनी केली आहे. पोलीस ठाण्याबाहेर गर्दी जमल्यानं गोंधळ उडाला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधकांनी राज्य सरकार आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आज चंद्रकांत पाटील हे पिंपरी-चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी आले असताना एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घराबाहेर पडताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. मात्र यानंतर शाईफेक करणाऱ्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. आधी चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यानंतर आमच्यावर कारवाई करा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. हेही वाचा : Chandrakant Patil : विरोधकांनो कार्यकर्त्यांना आवरा, अन्यथा…’, चंद्रकांत पाटलांच्या शाईफेकीनंतर भाजपचा इशारा भाजप आक्रमक दरम्यान दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर भाजप देखील आक्रमक झाले आहे. भाजप नेते राम कदम यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. ‘शाई फेकणाऱ्यांच्या घरात घुसून त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर कसं द्यायचं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे. आम्ही कायदा सुव्यवस्थेचा सन्मान करणारे लोक आहोत. विरोधी पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आवरावे’, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.