देशभरातील ज्या शहरांतील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. त्यातच शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. आता मात्र यामध्ये काहीसा बदल होणार आहे.
पुणे, 15 एप्रिल : पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा एकदा वेगाने वाढू लागला आहे. अशातच ससून रुग्णालयातील आणखी एका डॉक्टरला कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यानंतर आता तीन नर्ससहित डॉक्टरांनाही आयसोलेट करण्यात आलं आहे. याआधीच ससूनमधील तीन नर्स पॉजिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती. ससूनमधील कोरोना वार्डातील 3 नर्सना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे, भवानीपेठेतील पालिकेचं सोनवणे रूग्णालयही सील बंद करण्यात आलं आहे. कोरोनाच्या विळख्यात सापडलेले डॉक्टर आणि नर्स कोरोना रूग्णाच्या संपर्कात आले होते, अशी माहिती आहे. पुण्यात सर्वाधिक 85 पेशंट भवानी पेठेत आढळले आहेत. ससूनमध्ये आतापर्यंत 28 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ससूनमधील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टरांचा टास्कफोर्स करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात पुण्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. दरम्यान, पुण्यातील 16 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणखी 28 परिसर आज सकाळपासून सील करण्यात आले. यामध्ये पुणे शहरातील जवळपास प्रत्येक भागातील अशा परिसरांचा समावेश आहे जिथे लोक अजूनही बाहेर फिरताना दिसत आहेत. पुण्यात याआधीच चार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाच परिसर सील करण्यात आले आहेत. आता आणखी 28 परिसर सील करण्यात आल्यामुळे लॉकडाऊन आणखी कडक होणार आहे. नुकतंच महापालिका आयुक्तांनी पुण्यातील काही परिसर सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि पोलिसांकडे दिला होता. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावामधे आणखी काही परिसरांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपादन - अक्षय शितोळे