JOIN US
मराठी बातम्या / पुणे / शिवसेनेची नवी जाहिरात, अजितदादांचे खोचक सवाल; म्हणाले...

शिवसेनेची नवी जाहिरात, अजितदादांचे खोचक सवाल; म्हणाले...

आज पुन्हा एकदा शिवसेनेची नवी जाहिरात छापण्यात आली आहे. या नव्या जाहिरातीवरून अजित पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.

जाहिरात

अजित पवार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जून :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रियतेबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेची जाहिरात मंगळवारी वेगवेगळ्या वृत्तपत्रात छापण्यात आली. या जाहिरातीवरून वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा सुधारित जाहिरात छापण्यात आली आहे. आजच्या जाहिरातीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित करत खोचक टोला लगावला आहे. नेमकं काय म्हणाले अजित पवार?  आजची जाहिरात म्हणजे सारवासारव करण्याचा प्रयत्न आहे. कालच्या चुकीची शिवसेनेकडून दुरुस्ती करण्यात आली आहे. असा खोडसाळपणा पुन्हा होऊ नये. ही जाहिरात देणारा तो हितचिंतक नेमका कोण आहे? या जाहिरातींसाठी पैसे कोणी दिले? असे अनेक सवाल अजित पवार यांनी उपस्थित केले आहेत.

Political News : मनं दुखावणार नाही याची काळजी घ्या; जाहिरातीवर भाजपची पहिली प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

भाजपची प्रतिक्रिया  दरम्यान या जाहिरातीवर भाजपकडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मंगळवारी छापण्यात आलेल्या जाहिरातीवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनं दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी, शिंदे, फडणवीस यांची तुलना अंचबित करणारी आहे. माझी शिंदे आणि फडणवीसांसोबत यावर चर्चा झाली. कालच्या जाहिरातीबाबत खोडसाळपणा करण्यात आला. आजची जाहिरात म्हणजे हा खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे कार्यकर्ते नाराज झाल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. थोडे मतभेद झाले मात्र मनभेद नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या