पिंपरी, 04 जुलै: दोन वर्षांपूर्वी पिंपरीतील (Pimpari) एका युवकानं दुसऱ्याच्या प्रेयसीला (Lover) पळवून नेलं होतं. प्रेयसीला पळवून नेणाऱ्याचा पत्ता माहीत करून घेण्यासाठी संबंधित प्रियकरानं एका तरुणाचं अपहरण (Kidnapping) करून त्याची गळा आवळून हत्या (Murder) केली होती. यानंतर आरोपीनं तरुणाचा मृतदेह एका पोत्यात भरून मुळा नदीत टाकून दिला होता. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तब्बल दोन वर्षानंतर हत्येचा उलगडा केला आहे. याप्रकरणातील एका साक्षीदारानं पोलिसांनी गुप्त माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. धीरज मायराम नागर असं दोन वर्षांपूर्वी हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर आरिफ सिद्दीक शेख (वय-32, थेरगाव), सूरज ऊर्फ सोन्या अरविंद जगताप (वय-30, देहूरोड), सागर सुरेश जगताप (वय-30, थेरगाव) , चेतक नेपाळी अशी आरोपींची नावं आहेत. दोन वर्षांपूर्वी आरिफ शेख याच्या प्रेयसीला मृत धीरजच्या एका मित्रानं पळवून नेलं होतं. प्रेयसीला पळवून नेणाऱ्या तरुणाचा पत्ता माहीत करून घेण्यासाठी आरोपींनी 31 जुलै 2019 रोजी धीरजचं अपहरण केलं. हेही वाचा- पुण्यात ‘आश्रम’ वेब सीरीजची पुनरावृत्ती; अनैतिक संबंधातून व्यावसायिकाची हत्या सकाळ नं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींनी धीरजचं अपहरण केल्यानंतर त्याला वाकड परिसरातील मुंबई बेंगलोर महामार्गावरील मुळा नदी पात्रालगत असणाऱ्या एका भंगारच्या दुकानात आणलं. याठिकाणी आरोपींनी आरिफच्या प्रेयसीला पळवून नेणाऱ्या तरुणाचा पत्ता माहीत करुन घेण्यासाठी धीरजला बेदम मारहाण केली. तरीही पत्ता माहीत न झाल्यानं आरोपींनी धीरजचा काटा काढला. आरोपी सूरजनं धीरजचे पाय पकडले तर सागर आणि चेतकनं हात आवळून धरले. तर आरिफनं धीरजचा हातानं गळा आवळला. हेही वाचा- मैत्रिणीला दारू पाजून तरुणाचं धक्कादायक कृत्य;4 मित्रांना फोन करून बोलावलं अन्.. यानंतर आरोपींनी मृताची ओळख पटू नये म्हणून धीरजच्या अंगावरील कपडे काढून त्याचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि मृतदेह वाकड येथील मुळा नदीपात्रात टाकला. या प्रकरणातील साक्षीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे आरिफ, सूरज आणि सागर हे गुन्हेगार वृत्तीचे तरुण असून त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरिफ आणि सागर सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहेत.