NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / इंजिनिअरची नोकरी सोडून पठ्ठ्याने सुरु केले मशरूम उत्पादन! आता करतो लाखोंची कमाई

इंजिनिअरची नोकरी सोडून पठ्ठ्याने सुरु केले मशरूम उत्पादन! आता करतो लाखोंची कमाई

बेगुसराय जिल्ह्यातील सदर प्रखंडच्या रामदिरी गावच्या रहिवासी तरुणाने कमाल केली आहे. इलेक्ट्रिक इंजिनियर अमन कुमार यांनी नवादा नवादा येथे आपल्या प्रोजेक्टवर अनेक वर्षे काम केले. अमनने सांगितले की, जेव्हा तो सुट्टीवर घरी यायचा तेव्हा गावकरी त्याला स्वतःचे काम सुरु करण्यासाठी प्रवृत्त करत होते.

16

नीरज कुमार, बेगुसराय: बिहारमध्ये आता कुठे सुशिक्षित लोकांचा कल शेतीकडे वळत आहे. शेती हा व्यवसाय म्हणून स्वीकारून ते घरबसल्या लाखो रुपये कमवताय. अशीच एक व्यक्ती म्हणजेइलेक्ट्रॉनिक इंजिनिअर अमन कुमार. जो बेगुसराय जिल्ह्यातील सदर प्रखंडमधील रामदिरी येथील रहिवासी आहे. गावकऱ्यांना शेती करताना पाहून तो इतका प्रभावित झाला की त्याने इंजिनिअरची नोकरी सोडली. आता तो इतरांना रोजगार देण्यासोबतच स्वतः देखील लाखोंची कमाई करतोय. शेतात वेगळा प्रयोग करण्याआधी घ्या ही काळजी, शेतकरी सांगतोय त्याचा अनुभव

26

नोकरी उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले. शेतीशी संबंधित व्यवसाय करावा अशी त्याची इच्छा होती. असा व्यवसाय ज्यामध्ये त्याच्या शिक्षणाचा देखील उपयोग पडेल. अशा वेळी या तरुणाने घरी बसूनच मशरूमचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. सध्या अमन कुमार यशस्वीपणे मशरूमची लागवड करत असून 10 जणांना काम देण्यासोबत लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत.

36

बेगुसराय जिल्ह्यातील सदर प्रखंडमधील रामदिरी गावचे रहिवासी आणि इलेक्ट्रिक इंजिनियर अमन कुमार यांनी नवादा येथील त्यांच्या प्रकल्पावर अनेक वर्षे काम केले. अमनने सांगितले की, जेव्हा तो सुट्टीवर घरी यायचा तेव्हा गावकरी त्याला स्वतःचे काम करायला प्रवृत्त करायचे. यानंतर त्यांनी स्वतःचे काय काम करावे याचा शोध घेतला. MNC मधील नोकरी सोडून पठ्ठ्याने सुरू केली स्ट्रॉबेरीची शेती, आज काढतोय लाखोंचं उत्पन्न

46

हा तरुण असा व्यवसायाच्या शोधात होता ज्यामध्ये तंत्रज्ञाचा वापर करता येईल यासोबतच भरघोस उत्पन्नही निघेल. जेणेकरून आयुष्य चांगल्या पद्धतीने जाईल. याच काळात मशरूम उत्पादनाची त्यांना कल्पना सुचली. तरुणाने तयारी केली आणि सेटअप बसवून मशरूमचे उत्पादन सुरू केले. आता हा पठ्ठ्या टेक्नोलॉजी बेस्ड मशरुमचे उत्पादन करतोय.

56

अमन कुमार यांनी न्यूज 18 लोकलला सांगितले की, मशरूम उत्पादनासाठी तीन खोल्या तयार करण्यात आल्या. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने या खोलीचे तापमान गरजेनुसार कमी आणि जास्त ठेवले जाते. येथे महिन्याला सुमारे 10 मजूर काम करतात, तर गरज पडल्यास 10 ते 15 मजूर बोलावले जातात.

66

दर महिन्याला 4 ते 5 लाख किमतीच्या मशरूमची विक्री होत असून महिन्याभरात एक लाखापर्यंत कमाई होत आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील कुंदन कुमार देखील त्यांच्या मशरूम उत्पादन फॉर्ममध्ये काम करत आहेत आणि त्यांना दरमहा 20 हजारांपर्यंत पगार मिळत आहे. दुसरीकडे इतर मजुरांना त्यांच्या कामानुसार दरमहा पगार दिला जातो.

  • FIRST PUBLISHED :