शक्ती सिंह प्रतिनिधी कोटा : स्ट्रॉबेरीसाठी हवामान थंड लागतं मात्र राजस्थानच्या कोटा इथे एका तरुणानं स्ट्रॉबेरी पिकवली. नुसती पिकवली नाही तर त्यामधून भरपूर उत्पन्नही त्याने मिळवलं आहे.
2/ 11
नोकरीसोडून शेतीत काहीतरी वेगळा प्रयोग करण्याची जोखीम दाम्पत्याने स्वीकारलं आणि शेतीतून सोनं केलं. स्ट्रॉबेरीच्या लागवडीत कमी वेळात चांगला नफा मिळत असल्याचे कपिल जैन यांनी सांगितलं.
3/ 11
मध्य प्रदेशातील नीमच येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणली होती. पहिल्या वर्षी स्ट्रॉबेरीमध्ये ₹3 लाखांचा नफाही मिळाला. एक बिघा जमिनीमध्ये त्यांनी 12000 स्ट्रॉबेरीची रोपे लावली. त्यांची व्यवस्थित काळजी घेतली.
4/ 11
स्ट्रॉबेरीच्या लागवडीतील खाचखळगे विशेष माहिती नसल्याने सुरुवातीच्या वर्षात फार नफा मिळवता आला नाही. मात्र त्यांनी हार मानली नाही. पुन्हा एकदा नव्या जोमाने तयारी केली आणि यावर्षी उत्तम नफा मिळवला.
5/ 11
आजच्या घडीला कपिल आणि त्यांच्या बायकोने गावातील लोकांनाही चांगला रोजगार मिळवून दिला आहे. या दोघांची कोटामध्ये सध्या चर्चा होत आहे.
6/ 11
शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांबरोबरच बागायती पिकांकडे लक्ष दिल्यास चांगला नफा मिळू शकतो असं कपिल सांगतात.
7/ 11
बागायती पिकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना बाजारात चांगला भाव मिळतो.
8/ 11
आंबा, डाळिंब, केळी, नाशपाती याबरोबरच स्ट्रॉबेरीची लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.पिकांच्या लागवडीसाठी शासनाकडूनही मदत दिली जाते
9/ 11
या स्ट्रॉबेरीला व्यवस्थिती पॅकिंग करून ते विकतात. त्यातून त्यांना मोठा फायदा मिळतो. यामुळे गावात रोजगारही निर्माण झाले आहेत.
10/ 11
फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य माहिती काढता आली पाहिजे.
11/ 11
बाजारात या फळाचा भाव चांगला आहे. त्याची योग्य पद्धतीने लागवड केल्यास त्यातून चांगला नफा मिळू शकतो.