NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / सोनं खरेदी करायचंय? मग गमावू नका ही संधी! इथे मिळतंय स्वस्त सोनं

सोनं खरेदी करायचंय? मग गमावू नका ही संधी! इथे मिळतंय स्वस्त सोनं

गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणूक केल्यास सोन्याच्या किंमतींमधील वाढीचा फायदा होतो. यासोबतच सुरुवातीला गुंतवल्या जाणाऱ्या रकमेवर 2.5 टक्के व्याजही मिळते.

15

Gold: तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आजपासून तुम्हाला गुंतवणुकीची मोठी संधी मिळणार आहे. जी तुमच्यासाठी सोन्याच्या इतर पर्यायांपेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण यामुळे गुंतवणूकदारांना दुप्पट फायदा होतो.

25

सध्याच्या बाजार दरांच्या सरासरीनुसार किमतीत डिस्काउंट दिलं जात आहे. रिझर्व्ह बँकेच्या सॉवरेन गोल्ड बाँड योजनेची नवीन सीरीज, जी 6 मार्चपासून सबस्क्रिप्शनसाठी सुरु झाली आहे. तुम्हालाही या संधीचा फायदा घ्यायचा असेल, तर याविषयीच्या खास गोष्टी घ्या जाणून... सोनं खरेदी करताना राहा सावधान! सरकारने जारी केले नवे नियम

35

सबस्क्रिप्शनसाठी इश्यू प्राइस काय आहे? : रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन सीरीजसाठी सबस्क्रिप्शन 6 मार्चपासून सुरू झाली आहे. तुम्ही 10 मार्चपर्यंत बाँडमध्ये गुंतवणूक करू शकता. सेंट्रल बँकेने प्रति 10 ग्रॅम इश्यूची किंमत 5611 रुपये ठरवली आहे. जी मागील आठवड्यातील शेवटच्या 3 व्यापार सत्रातील सोन्याच्या दैनंदिन बंद किमतीच्या सरासरीवर ठरवली जाते. विशेष म्हणजे जे ग्राहक या सबस्क्रिप्शनसाठी ऑनलाइन अर्ज करतात त्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट दिली जाते. म्हणजेच त्यांना प्रति ग्रॅम फक्त 5561 रुपयेच मोजावे लागतील.

45

गोल्ड बाँड तुमच्यासाठी फायदेशीर सौदा आहे का? : तुम्हाला सोन्यात दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल किंवा तुमच्या मुलांसाठी सोने जमा करायचे असेल तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. काय सांगता! होळी खेळण्यासाठी मिळतेय सोन्या-चांदीची पिचकारी, किती आहे किंमत?

55

गोल्ड बाँड्सच्या माध्यमातून एकीकडे तुम्हाला सोन्याच्या किमती वाढण्याचा फायदा मिळतो. तर दुसरीकडे तुम्ही गुंतवलेल्या सुरुवातीच्या रकमेवर तुम्हाला 2.5% व्याज उत्पन्न मिळते. बाँडसाठी निश्चित कालावधी 8 वर्षे आहे. नियमानुसार गुंतवणूकदार 5 वर्षांनंतर पैसे काढू देखील शकतात.

  • FIRST PUBLISHED :