होम लोन घेण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, काही बँकांमध्ये होम लोनवर आकारण्यात येणाऱ्या व्याजाची तुलना करून, तुम्ही स्वस्त होम लोन मिळवू शकता.
रिझर्व्ह बँकेने 8 फेब्रुवारी 2023 रोजी रेपो रेटमध्ये 25 अंकांची वाढ केली आहे. या वाढीनंतर देशातील अनेक बँकांनी पर्सनल, कार आणि होम लोनवरील व्याजदरात वाढ केली आहे. आणि हे लोन पूर्वीपेक्षा महाग झाले आहेत. यासोबतच EMIही वाढला आहे.
होम लोन घेण्यापूर्वी काही मोठ्या बँकांचे व्याजदर जाणून घेतले पाहिजेत. यामध्ये SBI बँक, HDFC बँक, PNB बँक आणि बँक ऑफ बडोदा सारख्या बँकांचा समावेश आहे.
या बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासून घ्या. या बातमीत आम्ही तुम्हाला या बँकांच्या व्याजदराची संपूर्ण माहिती देणार आहोत. या बँकांचे व्याजदर तुम्हाला माहीत असावेत. मग तुम्ही अशी बँक निवडू शकता जी तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज देत आहे. जाणून घ्या या सर्व बँकांचे व्याजदर...
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट् (MCLR)मध्ये 0.10 टक्के आणि रेपो रेट लिंक्ड लेंडिंग रेट 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे. SBIएका योजनेअंतर्गत कमी व्याजदरात कर्ज देत आहे. यामध्ये, व्याजदर तुमच्या CIBIL स्कोअरवर अवलंबून असतो. तुमचा CIBIL स्कोअर 800 असल्यास, तुम्हाला 8.85% दराने कर्ज मिळेल, 700-749 CIBIL स्कोर 8.95% आणि 550-649 वर 9.65 टक्क्यांनी लोन मिळेल. ATM Card होल्डर्ससाठी महत्त्वाची बातमी! आता मिळतोय 5 लाख रुपयांचा फायदा, पण कसा?
HDFC बँकेनेही आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. HDFC सह तुम्हाला 9% ते 9.50% व्याज द्यावे लागेल. महिलांसाठी हाच व्याजदर 8.95 टक्के ते 9.45टक्के आहे. LIC पॉलिसीधारकांसाठी गुडन्यूज! आता मिळणार 'ही' सुविधा
पंजाब नॅशनल बँकचे मॅक्स सेव्हर CIBIL स्कोअर 800 असल्यास 30 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर 8.80 टक्के व्याजाने होम लोन देत आहे. PNB बँक 700-749 च्या CIBIL स्कोअरसाठी 9 टक्के व्याज दर आकारेल. HDFC चं क्रेडिट कार्ड वापरता? मग तुमच्यासाठी गुडन्यूज, बँकेने सुरु केली खास सुविधा
बँक ऑफ बडोदा (BOB) कडून लोम लोनचे व्याजदर 8.90 टक्के ते 10.50 टक्क्यांपर्यंत आहेत. तसेच, जर तुमचा CIBIL स्कोर 600 च्या खाली असेल तर तुम्हाला 8.95 टक्के ते 10.60 टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.