NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / रोजच्या 333 रुपयांच्या बचतीने व्हाल लखपती, Post Office ची ही स्किम देते जबरदस्त रिटर्न

रोजच्या 333 रुपयांच्या बचतीने व्हाल लखपती, Post Office ची ही स्किम देते जबरदस्त रिटर्न

गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस विविध स्किम ऑफर करते. यावर गुंतवणुकदारांना चांगले रिटर्न मिळतात. म्हणूनच लोक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. आज आपण अशाच एका स्किमविषयी जाणून घेणार आहोत.

15

देशातील जनतेचा पोस्ट ऑफिस विभागावर सर्वाधिक विश्वास आहे. गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी पोस्ट ऑफिस रोज नवनवीन योजना घेऊन येत असते. सध्या तर महागाई खूप वाढली आहे. अशा स्थितीत सरकारी आणि खाजगी नोकऱ्या असलेले लोक कधीच मोठी गुंतवणूक सहजासहजी करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, थोड्या प्रमाणात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे.

25

आरडी योजना काय आहे : पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी स्कीम तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला दर महिन्याला आरडी स्कीममध्ये गुंतवणूक करावी लागेल. पोस्ट ऑफिसमध्ये त्याला आरडी खाते असेही म्हणतात. तुम्ही दरमहा रु. 10,000 च्या गुंतवणुकीसह 10 वर्षात एक मोठा फंड तयार करू शकता. म्हणजेच हे रोजचे 333 रुपये होतात. संकटाच्या वेळी पैशांसाठी कोणासमोर हात पसरायची गरज नाही, हे पर्याय आहेत बेस्ट

35

टाकता येतात कितीही पैसे : 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये खाते उघडू शकते. तुम्ही या खात्यात फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेतून गुंतवणूक सुरू करू शकता. ही योजना शासनाच्या हमी योजनेसह येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. तुम्ही त्यात कितीही पैसे टाकू शकता. PPF अकाउंट बंद झालंय तर नो टेंशन! एका झटक्यात करता येईल सुरु, ही आहे प्रोसेस

45

आरडी 5 वर्षात मॅच्योर होईल : पोस्ट ऑफिस आरडी खाते उघडल्यानंतर 5 वर्षांनी किंवा 60 वर्षांनी मॅच्योर होते. तुम्ही ही RD 10 वर्षांसाठी वाढवू शकता. तुम्ही RD खाते 3 वर्षांनंतर बंद करू शकता किंवा खाते उघडल्यानंतर 1 वर्षानंतर तुम्ही 50% पर्यंत कर्ज घेऊ शकता. पोस्ट ऑफिस आरडी अकाउंटमध्ये 5 वर्ष रक्कम जमा केली नाही तरीही ते चालू राहू शकते.

55

असे मिळतील 16 लाख : जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8 टक्के व्याजदराने 16 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळेल. 10 वर्षातील तुमची एकूण ठेव रु. 12 लाख असेल आणि तुम्हाला अंदाजे रु. 4.26 लाख परतावा मिळेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 16.26 लाख रुपये मिळतील. कार लोन घ्यायचा विचार करताय? 'या' बँक ऑफर करताय सर्वात स्वस्त लोन

  • FIRST PUBLISHED :