बऱ्याचदा असं होतं की अडचणीच्या वेळी नेमके पैसे कमी पडतात किंवा कुठेतरी अडकलेले असतात. अशावेळी तुम्हाला नातेवाई, मित्र मैत्रिणी यांच्याकडून पैशांसाठी मदत मागावी लागते. अशावेळी तुमच्यासाठी एक पर्याय सुचवणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोणासमोर पैशांसाठी हात पसरणार नाही.
असं कोणतं आर्थिक संकट आलं तर तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. एवढंच नाही तर तुम्ही पीपीएफ, LIC पॉलिसी यावरही लोन मिळवू शकता. तत्काळ लोन मिळण्यासाठी तुमच्याकडे बँकेकडून वैयक्तिक कर्ज हा एकमेव पर्याय आहे. हे कर्ज घेणे सोपे नाही. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक मार्ग दाखवणार सांगणार आहोत.
तुम्हाला थोडं सर्च करावं लागेल की कोणती बँक तुम्हाला कमी व्याजदरामध्ये पर्सनल लोन देत आहे. याचं कारण म्हणजे पर्सनल लोन पटकन मिळतं मात्र त्यावर व्याजदर खूप असतं.
तुमच्याकडे दुसरा पर्याय म्हणजे PPF ला जर तुमचे पैसे जात असतील तर तुम्ही त्यावर 25 टक्के लोन घेऊ शकता. तुमची LIC police असेल तर तुम्ही त्यावर देखील लोन घेऊ शकता.
तुम्ही बँक FD ठेवली असेल तर त्यावर देखील तुम्हाला लोन घेता येतं. तुम्हाला किती लोन मिळणार हे मात्र बँकेच्या नियमावर असतं. त्यामुळे तुम्हाला थोडी शोधाशोध करणं गरजेचं आहे. मात्र हे पर्याय बेस्ट आहेत.
याचं कारण असं की तुम्ही नातेवाईक मित्र मैत्रिणींकडून आर्थिक मदत घेतली की पैसे तर व्याजासकट परत करायचे आहेतच पण वर ऐकूनही घ्यावं लागणार. त्यापेक्षा थोडी धडपड केली तर तुम्हाला असे चांगले पर्याय मिळून जातात.