NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या 5 स्किम देतात जबरदस्त रिटर्न्स, लगेच करा गुंतवणूक!

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या 5 स्किम देतात जबरदस्त रिटर्न्स, लगेच करा गुंतवणूक!

बदलत्या काळानुसार गुंतवणुकीचे अनेक पर्याय आले आहेत, परंतु आजही अनेकजण जुन्या पद्धतीने गुंतवणूक करणे पसंत करतात. आजही लोक पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

17

तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आम्ही तुम्हाला त्याच्या विविध योजनांची माहिती देत ​​आहोत. 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत बदल केले आहेत.

27

तुम्ही पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही सर्वाधिक व्याज देणाऱ्या योजनांविषयी तुम्हाला सांगणार आहोत.

37

मंथली इनकम स्कीममध्ये, ग्राहक एकरकमी पैसे गुंतवून दरमहा निश्चित उत्पन्न मिळवू शकतात. नुकतेच 2023 च्या अर्थसंकल्पात सरकारने त्यात गुंतवणूक मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्ही एका खात्यात 9 लाख रुपये आणि जॉइंट अकाउंटमध्ये 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.10 टक्के दराने रिटर्न मिळेल.

47

ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 8.00 टक्के व्याज मिळते. नुकतेच, सरकारने गुंतवणुकीची मर्यादा 15 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये केली आहे. LIC ची योजना तुमच्यावर करेल 'धनवर्षाव'! मिळेल जबरदस्त परतावा, लवकरच संपणार ऑफर

57

तुम्हाला तुमच्या मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही एका आर्थिक वर्षात 250 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये खातेदाराला 7.6 टक्के परतावा मिळतो.

67

किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.2 टक्के परतावा मिळू शकतो. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही 1,000 रुपयांपासून ते कमाल कितीही रक्कम गुंतवू शकता. ही रक्कम फक्त 100 रुपयांच्या पटीत असावी. यामध्ये तुमचे पैसे 120 महिन्यांत दुप्पट होतील. SBI ची ग्राहकांना मोठी भेट! आता FD वर मिळणार जास्त व्याज, चेक करा रेट्स

77

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) ही अशी एक छोटी बचत योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर 7.00% परतावा मिळेल. यामध्ये तुम्ही 1,000 रुपयांपासून ते 100 मल्टीपलमध्ये जेवढी रक्कम गुंतवू शकता तेवढी गुंतवा. तुम्ही NSC मध्ये एकूण 5 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. PPF मधून जास्त नफा कमावण्याची सोपी ट्रिक, होईल जास्त फायदा!

  • FIRST PUBLISHED :