NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / क्रेडिट कार्डच्या माध्यमातून असं करा UPI पेमेंट, या स्टेप करा फॉलो

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून असं करा UPI पेमेंट, या स्टेप करा फॉलो

2022 मध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना UPI द्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट करण्याचा पर्याय देण्याची घोषणा केली होती. ज्यामुळे, लोक UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरू शकतात. UPI ने सुरुवातीला ग्राहकांना फक्त बँक खाती म्हणजेच नेटबँकिंग वापरण्याची परवानगी दिली होती.

15

सध्याच्या काळात जास्तीत जास्त लोक हे क्रेडिट कार्डचा वापर करतात. आता नवीन सर्व्हिस अंतर्गत यूझर्सला क्रेडिट कार्डने यूपीआय पेमेंट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच ग्राहकांना ट्रेडरचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल आणि क्रेडिट कार्डचा वापर करुन पेमेंट करावी लागेल. यूपीआय वर पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर कसा करावा याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

25

पहिले आपल्या एंड्रॉइड किंवा आयओएस स्मार्टफोनवर भीम अॅप डाऊनलोड करा. अॅपवर साइन अप किंवा लॉगिन करा. टॉपवर बँक अकाउंट सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर खाली दिलेल्या प्लस बटनवर क्लिक करा. आता आधार कार्डवर होणार नाही फसवणूक! UIDAI ने लॉन्च केले नवीन सेफ्टी फिचर

35

आता क्रेडिट कार्डवर क्लिक करा. आपले क्रेडिट कार्ड जारी करणारी बँक निवडा. तुमचं क्रेडिट कार्ड किंवा त्या बँकेचे क्रेडिट कार्ड भीम अॅपवर मान्य आहे की नाही हे अॅप तुम्हाला सांगेल. तुमच्या कार्डची आवश्यक माहिती सेव्ह करा. आता तुमचं कार्ड अटॅच होईल. आवश्यक माहिती भरा आणि तुमचं क्रेडि कार्ड लिंक केलं जाईल. कमी जोखमीसह अधिक रिटर्न्स हवेत? डेट म्युच्युअल फंड आहेत बेस्ट

45

केवळ याच बँकांच्या क्रेडिट कार्डने करता येते यूपीआय पेमेंट : एचडीएफसी बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, यूनियन बँक

55

यूपीआय पिन करावं लागेल सेट: भीम अॅपवर आपल्या क्रेडिट कार्डचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला 4 अंक किंवा 6 अंकांचा UPI पिन सेट करावा लागेल. तुम्ही अॅपवरुनच पिन सेट करु शकता किंवा हे बदलू शकता. तुम्ही भीम अॅपवर क्रॅडिट कार्ड लिंक करु शकत असाल तर तुम्ही आता याचा वापर मर्चेंट पेमेंटसाठीही करु शकता.

  • FIRST PUBLISHED :