तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल तर तुम्हाला केंद्र सरकारच्या या अलर्टची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. केंद्र सरकारने सोमवारी पासपोर्टशी संबंधित सेवा शोधणाऱ्या लोकांनी बनावट वेबसाइट्स किंवा मोबाइल अॅप्लिकेशनला बळी पडू नका, असा इशारा दिला आहे. सरकारी अलर्टमध्ये म्हटले आहे की, 'अनेक बनावट वेबसाइट आणि मोबाइल अॅप्स अर्जदारांकडून डेटा गोळा करत आहेत आणि प्रचंड पैसे आकारत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.
सरकारने इशारा देत म्हटलेय की, 'अनेक बनावट वेबसाइट्स आणि मोबाईल अॅप्लिकेशन्स अर्जदारांकडून डेटा गोळा करत आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आणि पासपोर्ट संबंधित सेवांसाठी अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. यापैकी काही बनावट वेबसाइट्स org डोमेन नावाने नोंदणीकृत आहे., काही IN सह रजिस्टर्ड आहेत आणि काही डॉट कॉमवर रजिस्टर्ड आहेत. SBI ग्राहकांसाठी मोठा झटका! सर्वात जास्त व्याज देणारी ही स्कीम होणार बंद
या आहेत फेक वेबसाइट्स... www.indiapassport.org, www.online-passportindia.com, www.passportindiaportal.in, www.passport-india.in, www.passport-seva.in, www.applypassport.org आणि अशाच काही आणखी वेबसाइटही असू शकतात. EPFO News : ईपीएफओमधून जास्त पेन्शन हवीये? नवीन गाइडलाइन्स जारी, असा करता येणार अर्ज
अलर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, त्यामुळे भारतीय पासपोर्ट आणि संबंधित सेवांसाठी अर्ज करणार्या सर्व नागरिकांनी फसव्या वेबसाइट्सना भेट देऊ नये किंवा पासपोर्ट सेवेशी संबंधित पेमेंट करू नये, अन्यथा त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. पासपोर्ट सेवांसाठी भारत सरकारची फक्त एक अधिकृत वेबसाइट आहे. पासपोर्ट सेवांसाठी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट passportindia.gov.in आहे. ज्याची लिंक www.passportindia.gov.in आहे.Aadhaar Card: 10 वर्ष जुनं आधार कार्ड वापरत असाल तर सावधान! लगेच करा 'हे' काम
पासपोर्ट सेवांसाठी सरकारी अधिकृत अॅप देखील आहे : अर्जदार अधिकृत मोबाइल अॅप mPassport Seva देखील वापरू शकतात. जे Android आणि iOS अॅप्लिकेशन स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकतात.