EPFO issues new guideline : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( EPFO ) ने कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत अधिक निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सेवानिवृत्ती निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेने सांगितले की, सदस्य आणि त्यांचे नियोक्ते यासाठी संयुक्तपणे अर्ज करू शकतील. नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन (सुधारणा) योजना, 2014 वर शिक्कामोर्तब केलं होतं. याआधी, 22 ऑगस्ट 2014 च्या EPS दुरुस्तीने पेन्शनपात्र वेतन मर्यादा 6,500 रुपये प्रति महिना वरून 15,000 रुपये प्रति महिना केली होती. तसेच, सदस्यांना आणि त्यांच्या नियोक्त्यांना त्यांच्या मुळ पगाराच्या 8.33% EPS मध्ये योगदान देण्याची परवानगी दिली होती.
Post Office सेविंग्स अकाउंट्मध्ये असे चेक करा बॅलेन्स, 7 सोप्या पद्धतीकरता येईल ऑनलाइन रजिस्ट्रेशन
EPFO ने एका कार्यालयीन आदेशात त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांद्वारे ‘Joint Option Form’ विषयी माहिती दिली आहे. ईपीएफओने सांगितलं की, एक ऑनलाइन सुविधा देण्यात येणार आहे. ज्यासाठी URL (युनिक रिसोर्स लोकेशन) लवकरच सांगितली जाईल. ही सुविधा सुरू झाल्याची माहिती प्रादेशिक पीएफ आयुक्त त्यांच्या सूचना फलक आणि बॅनरद्वारे प्रसिद्ध करतील. आदेशानुसार, प्रत्येक अर्जाची नोंदणी केली जाईल. डिजिटली लॉग इन केले जाईल आणि अर्जदाराला एक पावती क्रमांक दिला जाईल. त्यात पुढे म्हटले आहे की, संबंधित प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे प्रभारी अधिकारी हाय सॅलरीवर जॉइंट ऑप्शनच्या प्रत्येक प्रकरणाची तपासणी करतील. यानंतर, अर्जदाराला ई-मेल/पोस्टद्वारे आणि नंतर एसएमएसद्वारे निर्णयाची माहिती दिली जाईल.
Axis Bank च्या ग्राहकांना धक्का! बँकेने नियमांत केले मोठे बदलउच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
-जास्त पेन्शन मिळवण्यासाठी, EPS सदस्याला जवळच्या EPFO कार्यालयात जावं लागेल. -तेथे त्यांना अर्जासोबत मागितलेली कागदपत्रे सादर करावी लागतील. -आयुक्तांनी दिलेल्या पद्धतीनुसार व स्वरूपानुसार अर्ज द्यावा लागेल. -जॉइंट ऑप्शनमध्ये डिसक्लेमर आणि डिक्लरेशन देखील असेल. -भविष्य निर्वाह निधीमधून निवृत्ती वेतन निधीमध्ये अॅडजस्टमेंट करण्याची गरज असल्यास, संयुक्त स्वरूपात कर्मचार्यांची संमती आवश्यक असेल. -एक्झम्प्टेड प्रॉव्हिडंट फंड ट्रस्टकडून पेन्शन फंडात निधी हस्तांतरित करण्याच्या बाबतीत, ट्रस्टीला हमीपत्र सादर करावे लागेल. -अर्ज सबमिट केल्यानंतर लवकरच URL (युनिक रिसोर्स लोकेशन) सांगितले जाईल.