NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / पेन्शनविषयी सरकारचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा

पेन्शनविषयी सरकारचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत हायर पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 मे पर्यंत वाढवली आहे.

15

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत हायर पेन्शन स्किमसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 3 मे पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी 3 मार्चची मुदत होती. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरच्या निर्णयात मार्चची मुदत अनिवार्य केली होती. 1 सप्टेंबर 2014 पूर्वी निवृत्त झालेले कर्मचारी हायर वेतनावर पेन्शनसाठी पात्र असतील, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी पॅरा 11(3) अंतर्गत पर्याय निवडला होता ते पात्र असतील. EPFO News : ईपीएफओमधून जास्त पेन्शन हवीये? नवीन गाइडलाइन्स जारी, असा करता येणार अर्ज

25

ईपीएफओने याविषयी माहिती देताना सांगितले की, या संदर्भात क्षेत्रीय कार्यालयांना 29 डिसेंबर 2022 आणि 05 जानेवारी 2023 च्या परिपत्रकांद्वारे आदेश जारी करण्यात आले आहेत. सोमवारी अधिकृत निवेदनात, EPFO ​​ने म्हटले आहे की. '01.09.2014 पूर्वी रिटायर होणाऱ्या आणि आपल्या सेवानिवृत्तीपूर्वी संयुक्त पर्यायांचा प्रयोग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जॉइंट ऑप्शनच्या पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याची ऑनलाइन सुविधा EPFO ​​द्वारे 3 मार्चपर्यंत वाढवली गेली होती.'या' प्लानमध्ये एकदा पैसे गुंतवा अन् आयुष्यभर मिळवा पेंशन, जाणून घ्या सविस्तर

35

'आता कर्मचारी/नियोक्ता संघटनेच्या मागणीनुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे चेअरमन यांनी अशा कर्मचार्‍यांकडून संयुक्त पर्यायांच्या पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 3 मे 2023 पर्यंत वाढवली आहे."

45

उच्च पेन्शनसाठी अतिरिक्त EPS योगदान : तुम्ही जास्त पेन्शन मिळवण्याचा पर्याय निवडल्यास तुम्हाला अतिरिक्त EPS योगदान द्यावे लागेल. नियोक्त्याचे योगदान दरमहा ₹15,000 च्या 8.33% पर्यंत मर्यादित आहे. तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीच्या वर्षांमध्ये उच्च पेन्शन मिळवण्यासाठी EPS (म्हणजे ₹1,250 प्रति महिना) मध्ये आपल्या वेतनाचे 8.33% योगदान देणे निवडू शकता.

55

जर तुम्ही कर्मचारी पेन्शन योजनेचे (EPS) सदस्य किमान 10 वर्षे असाल आणि EPS अंतर्गत तुमच्या जॉइनिंग तिथीच्या आधारावर तुमचे वय 50 किंवा 58 वर्षे पूर्ण झाले असेल, तर तुम्ही उच्च पेन्शनसाठी पात्र होऊ शकता.

  • FIRST PUBLISHED :