अनेक ई-कॉमर्स कंपन्या वेगवेगळ्या क्रेडिट कार्डांवर यूझर्सना विविध प्रकारचे डिस्काउंट ऑफर देतात. अशा परिस्थितीत अनेक लोक विविध ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवतात.
एकीकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचे काही फायदे आहेत, तर अनेक तोटेही आहेत. जर तुमच्याकडेही अनेक कंपन्यांची क्रेडिट कार्डे असतील तर आम्ही तुम्हाला त्याच्या तोट्यांबद्दल माहिती देत आहोत. SBI क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांनो सावधान! 17 मार्चपासून...
तुमच्याकडे अधिक क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्हाला एकापेक्षा जास्त कार्डांवर वार्षिक फीस जमा करावे लागेल. अशा परिस्थितीत तुमच्यावर आर्थिक भार वाढेल. Car Insurance घेताय? या 8 टिप्स ठेवा लक्षात, होईल फायदाच फायदा
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्याने तुम्ही विनाकारण शॉपींग कराल. यामुळे तुमच्यावरील कर्जाचा बोजा नंतर वाढू शकतो.
ऑफरचा लाभ घेताना अनेक वेळा लोक ईएमआयच्या चक्रात अडकतात आणि त्याच वस्तूसाठी जास्त पैसे मोजावे लागतात.
जर तुम्ही ही सर्व कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर तुम्ही देखील कर्ज बाजारी होऊ शकता. यामुळे तुमचा CIBIL स्कोर खराब होऊ शकतो.