NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / 'ही' कामं केली नसतील तर आत्ताच करा! अन्यथा होईल मोठे नुकसान, 31 मार्च आहे डेडलाईन

'ही' कामं केली नसतील तर आत्ताच करा! अन्यथा होईल मोठे नुकसान, 31 मार्च आहे डेडलाईन

आर्थिक दृष्टिकोनातून मार्च महिना खूप महत्त्वाचा आहे. आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना आहे. अशा परिस्थितीत आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी तुम्हाला अनेक कामे मार्गी लावावी लागतील.

16

पॅन-आधार लिंक, पीएम वय वंदना योजना, टॅक्स प्लॅनिंग यासारखी अनेक महत्त्वाची कामे तुम्ही अद्याप केली नसतील, तर आजच ती पूर्ण करा. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिक कामांची अंतिम मुदत 31 मार्च 2023 रोजी संपत आहे.

26

तुम्ही अजून पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर 31 मार्चपूर्वी करा. अन्यथा 1एप्रिलपासून तुमच्या पॅनचा काहीही उपयोग होणार नाही. यानंतर तुम्ही आयकर रिटर्न भरू शकणार नाही. 1 एप्रिलपासून हे काम करण्यासाठी तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. पॅन कार्डवरील अ‍ॅड्रेस चेंज करायचाय का? फॉलो करा या सिंपल स्टेप्स

36

जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ते 31 मार्च 2023 पर्यंतच करू शकतात. ही योजना पुढे नेण्यासाठी सरकारने कोणत्याही प्रकारची अधिसूचना जारी केलेली नाही. अशा परिस्थितीत तुम्ही मार्चपर्यंतच यात गुंतवणूक करू शकता.

46

तुम्ही अद्याप टॅक्स प्लानिंग केली नसेल, तर ही शेवटची संधी आहे. जर तुम्हाला PPF, सुकन्या समृद्धी योजना, ELSS इत्यादीद्वारे आर्थिक वर्ष 2022-23 साठी कर सूट मिळवायची असेल तर 31 मार्चच्या आत या योजनेत गुंतवणूक करा.

56

जर तुम्हाला जास्त प्रीमियमसह एलआयसी पॉलिसीवर देखील कर सूट मिळवायची असेल, तर तुम्हाला ही सूट फक्त 31 मार्च 2023 पर्यंत खरेदी केलेल्या पॉलिसीवर मिळू शकते. 1 एप्रिलपासून लोकांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही. आता कमी खर्चात बसवता येईल AC, वीज बिलही येईल कमी; जाणून घ्या किंमत?

66

तुम्ही म्युच्युअल फंडात नॉमिनेशनची प्रक्रिया अजून पूर्ण केली नसेल, तर हे काम लवकरात लवकर करा. यासाठी सर्व फंड हाऊसेसने 31 मार्चची मुदत दिली आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचे म्युच्युअल फंड अकाउंट फ्रीज केले जाईल.

  • FIRST PUBLISHED :