NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / ना इंधन ना चार्जिंग, तरीही रस्त्यांवर सुसाट धावते ही 'वंडर कार'; 100 km चा खर्च ऐकून व्हाल चकीत

ना इंधन ना चार्जिंग, तरीही रस्त्यांवर सुसाट धावते ही 'वंडर कार'; 100 km चा खर्च ऐकून व्हाल चकीत

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढलाय. मात्र एका व्यक्तीने अशी एक कार तयार केलीये जी इंधन आणि चार्जिंगशिवाय चालते. याविषयीच सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.

16

निलांजन बॅनर्जी :काटजुरीडंगा, बांकुरा येथील रहिवासी मनोजित मोंडल यांनी कमाल केली आहे. त्यांनी अशी कार तयार केलीये की, ती पेट्रोल किंवा चार्जिंगशिवायही रस्त्यांवर सुसाट धावते. त्यांनी जगावेगळी अशी सौरऊर्जेवर चालणारी कार तयार केली आहे.

26

पेशाने बिझनेसमन असणाऱ्या मनोजित यांनी त्यांच्या नॅनो कारचे सोलर कारमध्ये रूपांतर केलेय. आता या हटके कारसोबत ते बांकुरा येथील रस्त्यांवर फिरत आहेत. या कारला पेट्रोलची अजिबात गरज नाही. एवढंच काय तर ही गाडी इंजिनशिवाय धावते. उधारीवर घेतलेला लॅपटॉप विकून सुरु केला स्टार्टअप, आज हा तरुण करतोय लाखोंची कमाई!

36

कार चालवण्याचा खर्च पाहून तर तुम्हाला धक्काच बसेल. कारण ही पेट्रोलविरहित ‘सोलर कार’ अवघ्या 30 ते 35 रुपयांमध्ये 100 किलोमीटर धावते. त्यांची लाल सोलर कार आता बांकुरा येथील मॅकॅनिकल आयकॉन बनली आहे. 'या' 25 लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, देशात कुठेही करु शकतात सफर; यात तुम्हीही येता का?

46

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. बांकुरा येथील मनोजित मंडल सौरऊर्जेवर चालणारी कार बनवून दिशा दाखवत आहे. या कारचा प्रति किलोमीटर खर्च फक्त 80 पैसे आहे. इंजिन नसल्याने गाडी सुरू करूनही आवाज येत नाही. इंजिन नसले तरीही या गाडीमध्ये गीअर सिस्टम आहे. ही वंडर कार चौथ्या गीअरमध्ये 80 किमी प्रति तास वेगाने आरामात धावू शकते. तसंच गाडीचा काहीच आवाजही होत नाही. गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का? काय आहे कारण? जाणून घ्या इंट्रेस्टिंग फॅक्ट्स

56

मनोजित मंडल यांना लहानपणापासून काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी पेट्रोलच्या वाढत्या दराची तक्रार न करता स्वत:साठी सोलर कार बनवली. कार कन्व्हर्ट करताना मनोजित यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.

66

या वंडर कारने सरकारच्या मनात छाप सोडली नाही. तसंच सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, मर्यादित जीवाश्म इंधनाचा प्रश्न सोडवण्यात बांकुरा जिल्ह्यातील मनोजित मंडल हे नक्कीच यशस्वी झाले आहेत.

  • FIRST PUBLISHED :