NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / किती प्रकारचे असतात बँक अकाउंट? तुमच्यासाठी कोणतं योग्य? घ्या जाणून

किती प्रकारचे असतात बँक अकाउंट? तुमच्यासाठी कोणतं योग्य? घ्या जाणून

बँक खाते हे बँकांनी दिलेले आर्थिक खाते असतं. यामध्ये तुम्ही पैसे जमा करु शकता. या बँक खात्यांचे देखील प्रकार आहेत. तुम्ही कोणतं अकाउंट उघडलं पाहिजे याविषयी आपण जाणून घेऊया...

16

आजच्या काळात जवळपास सर्वांचेच बँक अकाउंट आहे. आजकाल लोक पैसे घरी ठेवण्याऐवजी बँकेत ठेवणे पसंत करतात. कारण पैसे बँकेत सुरक्षित असतात आणि त्यांना डिपॉझिटवर चांगले व्याजही मिळते. सर्व योजनांचे फायदे बहुतांशी फक्त बँक खात्यातूनच मिळतात. पण जेव्हा आपण बँकेत खाते उघडण्यासाठी जातो किंवा ऑनलाइन खाते उघडण्यासाठी फॉर्म भरतो तेव्हा बँकेतही आपल्याला कोणते खाते उघडायचे हे विचारले जाते. अनेकदा कोणते बँक खाते उघडावे हे अनेकांना माहिती नसते. कारण बँक अकाउंटचे देखील विविध प्रकार असतात. हे प्रकार कोणते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

26

सेविंग अकाउंट : नावावरून हे स्पष्ट होते की बँकेत पैसे सेव्ह करण्यासाठी सेविंग अकाउंट उघडली जातात. यामध्ये कोणतीही व्यक्ती पैसे जमा केल्यावर त्याच्या जमा केलेल्या रकमेवर बँकेने दिलेल्या व्याजाचा फायदा घेऊ शकतो. बचत खाते कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक व्यवहारांसाठी उघडले जाते. बचत खाते उघडताना ग्राहकाला बँकेने निश्चित केलेले मिनिमम बॅलेन्स जमा करावे लागते. बँक खातेदारांना चेकबुक, डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या सुविधा पुरवते. ते सिंगल किंवा जॉइंट अकाउंट म्हणूनही उघडता येते. सेविंग अकाउंटवर तुम्हाला व्याज मिळते.

36

करंट अकाउंट: हे अकाउंट उघडण्याचा उद्देश व्याज मिळवणे किंवा बचत करणे हा नाही. तर चालू खाते व्यवसायाच्या सोयीसाठी आहे. हे असे खाते आहे ज्यामध्ये नेहमीच व्यवहार चालू असतात. म्हणूनच करंट अकाउंटला फाइनेंशियल अकाउंट किंवा चालू अकाउंट असंही म्हणतात. यामध्ये तुम्ही हव्या तेवढ्या वेळेस पैशांचा व्यवहार करू शकता. पण इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे व्याज मिळत नाही. करंट बँक अकाउंटमधून सर्विस चार्जही कापले जाते. Aadhaar Card: 10 वर्ष जुनं आधार कार्ड वापरत असाल तर सावधान! लगेच करा 'हे' काम

46

फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट : आजकाल सेविंग करणे खूप कठीण असते. काही लोकांचे उत्पन्न खूप चांगले आहे. पण त्यांच्याकडे बचतीच्या नावावर काहीच नसते. बहुतेक लोक बचतीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. बचतीसाठी, बँका आणि पोस्ट ऑफिसमधून आरडी आणि एफडी सुविधा उपलब्ध आहेत. फिक्स्ड डिपॉझिटहा गुंतवणुकीचा सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. त्यात गुंतवणूक करण्यापूर्वीच तुम्हाला मॅच्युरिटीवर किती नफा मिळतो याची माहिती मिळते. कोणतेही तारण न ठेवता मिळवा 10 लाखांच कर्ज, ही सरकारी योजना देतेय लोन !

56

रिकरिंग डिपॉझिट अकाउंट : बरेच लोक बचतीसाठी आरडी खाते उघडतात. ज्यामध्ये त्यांना ठराविक रक्कम जमा करावी लागते. पोस्ट ऑफिस, सरकारी आणि गैर-सरकारी बँकांमध्ये आरडी खाते सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे जमा केलेल्या रकमेवर निश्चित व्याज देखील मिळते. RD हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. जुनं सॅलरी अकाउंट बंद करायचंय? अवश्य जाणून घ्या 'या' गोष्टी

66

बेसिक सेविंग अकाउंट : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 2005 मध्ये या प्रकारचे खाते जारी केले होते. समाजातील वंचित गरीब लोकांना बँकेच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश होता. सहसा, बँका तुमच्या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्याच्या अटीवर सेविंग अकाउंट उघडतात. परंतु काही बँका झिरो बॅलेन्स अकाउंटही ऑफर करतात. या अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवणे गरजेचे नसते. त्याला बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाउंट असं म्हटलं जातं.

  • FIRST PUBLISHED :