NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / आधार कार्डमध्ये नाव चुकलंय? 'या' ट्रिकने घरबसल्या करा करेक्ट

आधार कार्डमध्ये नाव चुकलंय? 'या' ट्रिकने घरबसल्या करा करेक्ट

आधार कार्ड हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. ज्यांना त्यांच्या आधार कार्डावरील नावाचे स्पेलिंग दुरुस्त करायचे आहे किंवा नाव बदलायचे आहे, ते UIDAI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे करू शकतात.

16

UIDAI ने लोकांना आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. एवढेच नाही तर भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांना त्यांची जागा बदलावी लागली तर ते त्यांचा पत्ता आधारमध्ये अपडेट करून घेऊ शकतात. तुमच्या आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही देखील करु शकता. हेल्थ इंश्योरेंस घेताय? सब लिमिटचा फंडा अवश्य घ्या जाणून

26

अनेकदा लोकांच्या आधार कार्डमध्ये मोबाईल क्रमांक किंवा पत्त्यासह अनेक चुका होतात. कधी-कधी नावही चुकते. ते कसं बदलावं असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर तुम्ही याची प्रोसेस अवश्य जाणून घ्यायला हवी. मार्च महिन्यासाठी IRCTC चा जबरदस्त प्लान! 'या' शहरांची स्वस्तात करा सैर

36

आधार कार्डमधील नाव, पत्ता आणि जन्मतारीख यासारखे सर्व पर्सनल डिटेल अपडेट करण्यासाठी, आधार कार्डवर तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर्ड करणे आवश्यक आहे. जेणेकरून अपडेट दरम्यान त्याच नंबरवर OTP पाठवता येईल. पुढे पाहूया आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस... फक्त 150 रुपयांत सुधारेल मुलांचे भविष्य, LIC च्या या योजनेत आजच करा गुंतवणूक

46

सर्वप्रथम, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर मोबाईल नंबर आणि ओटीपीच्या मदतीने लॉगिन करा. यानंतर कॅप्चा भरावा लागेल. त्यानंतर Send OTP वर क्लिक करा.

56

आता तुमच्या फोन नंबरवर पाठवलेला OTP टाकावा लागेल. त्यानंतर सबमिट वर क्लिक करा. यानंतर, खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला ऑनलाइन आधार सेवा दिसेल. येथे दिलेल्या यादीमध्ये नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि इतर अनेक गोष्टी दिसतील. आता तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे ती सिलेक्ट करा.

66

What do you want to update ऑप्शन हा पर्याय निवडणे आवश्यक असेल. नंतर एक नवीन पेज उघडेल आणि आपल्याला कॅप्चा टाकावा लागेल. मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल. त्यानंतर Save आणि Proceed वर क्लिक करा.

  • FIRST PUBLISHED :