बिग बॉस मराठी 4चा ग्रँड फिनाले 8 जानेवारीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
घराबाहेर गेलेल्या कलाकारांची डान्स प्रॅक्टिसही पूर्ण झाली आहे.
घरातील सगळे सदस्य फिनालेच्या आधी पुन्हा एकत्र येणार आहेत.
बिग बॉसच्या घरातील टॉप 5 स्पर्धकांना भेटण्यासाठी सगळे स्पर्धक घरात येणार आहेत.
विकासनं किरण मानेंना पाहताच त्यांना मिठी मारली आहे.
सगळ्या सदस्यांना पुन्हा घरात पाहताना प्रेक्षकांनाही मजा येणार आहे.
शेवटच्या आठवड्यात मिड विक इविक्शन झालं. यात आरोह वेलणकर घराबाहेर गेला.
बिग बॉस मराठी 4चा विजेता कोण ठरणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.