बिग बॉस मराठी 2चा विजेता आणि बिग बॉस 16चा सेकंड रनरअप शिव ठाकरे सध्या मुंबईत आहे.
लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा आपला माणूस शिव ठाकरे लवकरच खतरो के खिलाडीच्या 13व्या सीझनमध्ये दिसणार आहे.
खतरो के खिलाडीमध्ये जाण्याआधी शिव मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचला.
सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी गेलेल्या शिवला पाहण्यासाठी आणि त्याला आशिर्वाद देण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती.
खतरो के खिलाडीमध्ये जाण्याआधी बाप्पाचं दर्शन घेणं मस्ट आहे. तो आहे तर सगळं आहे असं शिवनं यावेळी म्हटलं.