विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी
नाशिक, 5 फेब्रुवारी : गोदावरी किनारी ओढा गावालगत वसलेल्या सिद्धिविनायक गणपती मंदिराची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारा आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून भाविकांची या गणपतीवर अपार श्रद्धा आहे. शेकडो वर्षे पुरातन हे मंदिर आहे. ओढा गाव आणि परिसरातील गावांना सुखशांती पूर्वी मिळत नव्हती म्हणून ओढेकर जहागीरदारानी 1680 साली या मंदिराची स्थापना केली आहे.
नंदीच्या शिंगांमधून होत गणपतीचे दर्शन
गणपतीची स्वयंभू मूर्ती असून जागृत देवस्थान अशी या मंदिराची ख्याती आहे. शेकडो भाविक दररोज गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. या गणपती मंदिराच्या समोर दोन महादेवाची पुरातन मंदिर आहेत. त्या मंदिरातील महादेवाच्या समोरील नंदीच्या शिंगांमधून गणपतीचं दर्शन होतं, असं अभ्यासक मधुकर पेखळे सांगतात.
उजव्या सोंडेच एकमेव गणपती मंदिर
या परिसरात उजव्या सोंडेच एकमेव गणपती मंदिर आहे. भाविक दररोज मनोभावे या गणपतीची पूजा करतात. भक्तांनी गणपती समोर व्यक्त केलेली इच्छा अपेक्षा गणपती पूर्ण करतो असे येथील भक्त सांगतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे अंगारकी चतुर्थीला भाविकांची दर्शनासाठी मोठी रीघ या ठिकाणी असते. भाविक मोठ्या श्रध्देने दर्शनासाठी येत असतात, असंही मधुकर पेखळे यांनी सांगितले.
बाप्पाला साकडं घालताच नोकरी लागली
गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून ओढा गावातील बाळासाहेब पेखळे गणपती बाप्पाची निस्वार्थ सेवा करतात. दररोज पुजा पाठ करून ते आपल्या दिवसाची सुरुवात करतात. 'गणपती बाप्पाची आमच्यावर कृपा आहे. बाप्पा अनेक वेळा आमच्या हाकेला धावून आला आहे. आमच्या मनोकामना पूर्ण केल्या आहेत. नोकरीसाठी माझा मुलगा चेन्नईला गेला होता. तिथं त्याने इंटरव्ह्यू देऊन बरेच दिवस झाले होते. मात्र, त्याचं सिलेकशन होत नव्हतं. मी बाप्पाकडे साकडं घातलं. गणपती बाप्पा माझ्या मुलाला लवकर नोकरी मिळूदे आणि लगेच काही दिवसातच मुलाला नोकरी लागली. इच्छा पूर्ण झाली',असं भक्त बाळासाहेब पेखळे सांगतात.
Amravati : तब्बल 500 किलोची घंटा ठेवण्यासाठी बांधलं चक्क नवं मंदिर, पाहा Video
गुगल मॅपवरून साभार
कुठे आहे हे मंदिर?
हे मंदिर नाशिक शहरापासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर ओढा गावालगत गोदावरी किनारी वसलेलं आहे. पहाटे 5 ते सायंकाळी 9 पर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुल असतं. या काळात भाविक दर्शन घेऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.