NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Anant Radhika Mehandi : अंबानींच्या सुनेचा राजेशाही थाट; मेहंदी आणि संगीत सोहळ्यासाठी सुंदर सजली राधिका

Anant Radhika Mehandi : अंबानींच्या सुनेचा राजेशाही थाट; मेहंदी आणि संगीत सोहळ्यासाठी सुंदर सजली राधिका

अंबानी कुटुंबात लगीनघाई आता लगीनघाई सुरु झाली आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची जोरदार सुरुवात झाली आहे. सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

19

सोशल मीडियावर सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत.

29

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची होणारी धाकटी सून फारच सुंदर दिसून येत आहे. यामध्ये राधिकाने गुलाबी रंगाचा हटके डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. सोबतच राधिकाने सुंदर अशी डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे. या लुकमध्ये राधिकाचं सौंदर्य अगदी खुलून गेलं आहे.

39

राधिकाचे मेहंदी सोहळ्यातील काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये राधिकाच्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढण्यात आली आहे.

49

राधिका आपला मेहंदी फंक्शन पुरेपूर एन्जॉय करताना दिसून येत आहे. राधिकाने आपल्या संगीत सोहळ्यात जबरदस्त डान्स परफॉर्मन्ससुद्धा केला आहे.

59

अंबानींच्या सुनेचा राधिकाचा हा थाट पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

69

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी अनेक वर्षांपासून एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. तसेच गेल्या काही महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

79

काही दिवसांपूर्वी परीकथे प्रमाणे थाटात आपला साखरपुडा पार पाडला होता. या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.

89

राधिका एक उत्तम नृत्यांगना आहे. अंबानी कुटुंबात नीता अंबानी यांच्यानंतर राधिका ही दुसरी व्यक्ती आहे, जिने भरतनाट्यम नृत्यप्रकारात अरंगेत्रम केलं आहे.

99

अंबानींच्या घराची होणारी धाकटी सून राधिका मर्चंट ही शैला आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकानं न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवी संपादन केली आहे. तसंच एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.

  • FIRST PUBLISHED :