राधिका आणि अनंत अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. गेल्या काही महिन्यांपासून ते एमेकांना डेट करत होते.
अंबानी कुटुंबात नीता अंबानी यांच्यानंतर राधिका ही दुसरी व्यक्ती आहे, जिने भरतनाट्यम नृत्यप्रकारात अरंगेत्रम केलं आहे.
राधिका ही मागील 8 वर्षांपासून गुरू भावना ठाकर यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेत होती. जून 2022मध्ये तिनं अरंगेत्रम पूर्ण केलं.
राधिकानं न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवी संपादन केली आहे. तसंच एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.
राधिका ही अनेक वर्ष 'श्री निभा आर्ट आर्ट फाउंडेशन'च्या संस्थापिका 'गुरू भावना ठाकर' यांच्याकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेत आहे.
सासू नीता अंबानी यांच्याबरोबर तिचं खास नातं आहे. दोघी भरतनाट्यम डान्सर असल्याचं त्यांच्यात खास बॉडिंग आहे.