मुंबई, 7 मे: खर्चासाठी 200 रुपये न दिल्याने एका माळीकाम करणाऱ्या कामगाराने सुपरवायझरच्या डोक्यात हातोडा घालून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. काशीमीरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपी लक्ष्मण दिता काकण (58, रा.सागवाडा, उदयपूर) असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. कर देवीवाल हरिराम कालागुमान( 25, रा. सलवाडा, उदयपूर, राजस्थान) असं मृत सुपरवायझरचं नाव आहे. हेही वाचा… गोल्डमॅनचं निधन, साडेआठ किलो सोन्यासह दिली होती राष्ट्रवादीची मुलाखत याबाबत मिळालेली माहिती अशी की, दहिसर चेकनाक्याजवर सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल आहे. स्कूल गार्डनमध्ये काम करण्यासाठी गुजरातचा ठेकेदार नेमण्यात आलं आहे. ठेकेदाराने कामासाठी कामगारांना लेबर कॅम्पमध्ये राहतात. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आरोपी लक्ष्मण काकण याने सुपरवायझर देवीलालकडे खर्चासाठी 200 रुपये मागितले होते. मात्र त्याने न दिल्याच्या रागातून लक्ष्मण याने देवीलाल याच्या डोक्यात हातोडा घालून त्याची निर्घृण हत्या केली. काशीमीरा पोलिसांना आरोपीला अटक केली आसून त्याला ठाणे कोर्टात हजर केले असता 10 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. हेही वाचा.. चिंताजनक! पुण्यात संसर्ग वाढला, कोरोनामुळे 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू दुसरीकडे,मुंबईच्या चेंबूर-वाशी नाका परिसरात लॉकडाऊनच्या काळात रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. एका कुटुंबातील तिघांवर 12 जणांनी भररस्त्यावर हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तरुणीची छेड काढल्यावरून हे हत्याकांड झाल्याची माहिती समोर आली आहे. भारत नगर भागात ही घटना घडली आहे. एका कुटुंबातील तीन जणांवर तब्बल 12 जणांनी धारदार हत्याराने हल्ला करून एकाची हत्या तर दोन जणांना गंभीर जखमी केलं आहे. प्रशांत पानवलकर असं मृत तरुणाचं नाव आहे. तर प्रशांतचे दोन्ही भाऊ (प्रल्हाद आणि प्रवीण) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. आरोपी आशिष यादव आणि अजित गुप्ता या दोघांनी पाच दिवसांपूर्वी एका तरुणीची छेड काढली होती. तरुणीचा बचाव करत प्रशांत पानवलकर या तरुणाने आरोपीशी भांडण केलं होतं. एवढंच नाहीतर या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी आरोपी आशिष यादव आणि अजित गुप्ताविरुद्ध विनयभंग आणि घातक हत्याराने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कोरोनामुळे या प्रकरणात जास्त लक्ष दिले नाही. लॉकडाऊनचा फायदा घेत गुन्हा दाखल झाल्याचा राग मनात ठेवून आरोपी आशिष आणि अजित यांनी दोघांनी दहा साथीदारांना घेऊन मंगळवारी संध्याकाळी न्यू भारत नगर येथे पीठ घेण्यास आलेल्या प्रशांत पानवलकर याच्यावर तलवारीने आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी आलेले त्याचे भाऊ प्रल्हाद आणि प्रवीणवर वार केले. यात दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सात जणांना आरसीएफ पोलिसांनी अटक केली असून पाच जणांचा शोध सुरू आहे, अशी माहिती या विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत देसाई यांनी दिली आहे.