19 वर्षांपूर्वी त्याने पोलीस ठाण्यात प्रवेश करून एका राज्यमंत्र्यांची हत्या केली होती आणि त्यानंतर त्याने राजकारणात येण्याचाही प्रयत्न केला. पण ते त्याला शक्य झालं नाही. विकासला अनेक वेळा अटक करण्यात आली. एकदा लखनऊमध्ये एसटीएफनंही त्याला ताब्यात घेतलं होतं.
कानपूर, 03 जुलै : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये थरारक घटना समोर आली आहे. कानपूर पोलिसांवर अज्ञातांनी भ्याड हल्ला करत गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये डीएसपीसह 8 पोलीस शहीद झाले आहे. या हल्ल्यात एसओ बिथूर यांच्यासह 6 पोलीस गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी पोलिसांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना उपचारासाठी रीजेंसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विकास दुबे नावाच्या व्यक्तीसह त्याच्या साथीदारांनी पोलिसांच्या पथकावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर त्यांनी पोलीस चौकीतील सर्व साहित्य लुटलं. . एडीजी कानपूर झोन, आयजी रेंज एसएसपी कानपूर यांच्यासह उत्तर प्रदेशातील पोलीस दल घटनास्थळी दाखल झालं आहे. या घटनेमुळे शुक्रवारी सकाळी मोठी खळबळ उडाली.
हत्या करण्यासाठी आलेल्या अज्ञातांनांकडून सलग गोळीबार सुरू होता. या गोळीबाराला पोलीस दलानं प्रत्युत्तर दिलं. या हल्ल्यात पोलीस चौकी इंचार्ज, एसओ, सीओ यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. तर 4 शिपायी जखमी आहेत. 7 ते 8 जणांनी मिळून हा हल्ला केला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी STF ची मदतही पोलीस दल घेणार असून STF आणि पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे कानपूर शहर हादरून गेलं आहे. संकलन, संपादन- क्रांती कानेटकर