JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मे महिन्यात तब्बल 64 लाख लोकांना झाला कोरोना, ICMR चा धक्कादायक खुलासा

मे महिन्यात तब्बल 64 लाख लोकांना झाला कोरोना, ICMR चा धक्कादायक खुलासा

सर्वेक्षणानुसार, प्रत्येक RT-PCR चाचणीत एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर येत होतं. त्यावेळी 82-130 अशी संक्रमणाची प्रकरणं समोर होती. कोरोनाची ही अवस्था तेव्हा होती जेव्हा देशभर लॉकडाऊन होतं.

जाहिरात

मुंबईची लोकसंख्या आणि गर्दीचं प्रमाण पाहता देशभर चिंता व्यक्त केली जात होती. तसच केंद्र आणि राज्य सरकारनेही आपलं सर्व लक्ष मुंबईवरच केंद्रीत केलं होतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : देशात सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, ICMR ने केलेल्या पहिल्या राष्ट्रीय सेरो सर्वेक्षणांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या सुरूवातीला, 0.73% प्रौढ म्हणजेच तब्बल 64 लाख (64,68,388) लोक कोरोना विषाणूच्या धोक्यामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, प्रत्येक RT-PCR चाचणीत एक पॉझिटिव्ह प्रकरण समोर येत होतं. त्यावेळी 82-130 अशी संक्रमणाची प्रकरणं समोर होती. कोरोनाची ही अवस्था तेव्हा होती जेव्हा देशभर लॉकडाऊन होतं. Sero सर्वेक्षणातून असं दिसून आलं की, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची एकही प्रकरणं समोर आली नाहीत त्या जिल्ह्यांमध्येही संसर्ग पसरल्याचं सेरो सर्व्हेमध्ये समोर आलं आहे. या सर्वेक्षण अहवालात असं म्हटलं आहे की, ज्या जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण आढळला नाही किंवा कमी रुग्ण आढळले अशा ठिकाणी कोरोना चाचण्याच कमी प्रमाणात झाल्या असाव्यात. त्यामुळे अशा ठिकाणी लॅब वाढण्याची गरज असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. हादरवणारे आकडे! पुण्यात पुन्हा एकदा सर्वोच्च संख्या; 24 तासांत 3000 नवे रुग्ण सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागात सेरो पॉझिटिव्हिटीचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे 69.4 टक्के होतं तर शहरी झोपडपट्ट्यांमध्ये ते 15.9 टक्के आणि शहरी नसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये 14.6 टक्के इतकं नोंदवलं गेलं आहे. 18-45 वर्षे (43.3) वयोगटात सेरो पॉझिटिव्हिटी सर्वाधिक असून 46-60 वर्षे (39.5) आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सर्वांत कमी सेरो पॉझिटिव्हिटी आहे. 11 मे ते 4 जून या वेळेत देशातील 21 राज्यांमधील 70 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या 700 गावे व प्रभागांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. वादग्रस्त पोस्टर! शिवसेना-कंगना वादाची तुलना महाभारतातील ‘वस्त्रहरण’ प्रसंगाशी दरम्यान, एकूण संक्रमित झालेल्यांपैकी 18.7 टक्के लोकांचं कामच असं होतं की ते सगळ्यात जास्त धोका असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येतील. अनेक जिल्ह्यांमध्ये हे संक्रमण कमी होतं. अशात भारत हा या साथीच्या रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आहे. असंख्य लोकांना अजूनही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे कन्टेंनमेंट झोनवर लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचं या सर्वेक्षणात समोर आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या