वादग्रस्त पोस्टर! शिवसेना-कंगना वादाची तुलना महाभारतातील 'वस्त्रहरण' प्रसंगाशी

वादग्रस्त पोस्टर! शिवसेना-कंगना वादाची तुलना महाभारतातील 'वस्त्रहरण' प्रसंगाशी

या पोस्टरमुळे मोठा गदारोळ झाला आहे

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : कंगना रणौत आणि शिवसेना यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. यावेळी अनेकांनी कंगनाला पाठिंबा दर्शविला असला तरी अनेक शिवसैनिकांकडून कंगनाचा आणि तिच्या ट्विटचा निषेध केला जात आहे. बिहार आणि हिमाचल प्रदेशनंतर आता उत्तर प्रदेशातूनही शिवसेनेवर टीका केली जात आहे. वाराणसीत तर एक पोस्टर झळकलं आहे. टिपण्णी सुरु झाली आहे. कंगना आणि शिवसेना वादावर वाराणसीत एक वादग्रस्त पोस्टर झळकलं आहे.

महाभारतातील ‘वस्त्रहरण’ प्रसंगाची तुलना कंगना-शिवसेना वादाशी करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री कंगना रणौतला द्रौपदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दुश्यासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कृष्ण दाखवण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये संजय राऊतही बसलेले दिसत आहेत. वाराणसीतील स्थानिक वकील श्रीपती मिश्रा यांनी हे पोस्टर लावले आहे. याबद्दल त्यांनी सांगितले की, कंगना आणि शिवसेना वादात महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कौरव सेनेप्रमाणे वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महिलांच्या संरक्षणासाठी पुढे आले व त्यांनी कंगनाला संरक्षण दिलं. या वादावर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही चकार शब्द काढला नाही, त्यामुळे मिश्रा यांनी त्यांच्यावरही टीका केली आहे.

हे ही वाचा-कंगनाने भाजप किंवा RPIमध्ये प्रवेश केल्यास स्वागत, बैठकीनंतर आठवलेंचं वक्तव्य

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत आहे. कंगनाने काल पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर अनेक शिवसैनिकांनी राग व्यक्त केला होता. यानंतर ठिकठिकाणाहून कंगनाच्या विरोधात निषेध केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. कंगनाच्या या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स येत आहेत. अनेकांनी कंगनाचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी कंगनाच्या या ट्विटला ड्रामा म्हटलं आहे.

हे ही वाचा-...म्हणून कंगनाची आई आली समोर, पंतप्रधान मोदींसह अमित शहांना दिला हा संदेश

कंगनानंतर आता तिची आई आशा रणौत यांनी मोदींसाठी एक संदेश दिला आहे.  तिच्या आईचं म्हणणं आहे की, त्यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पार्टीशी (Congress) जोडलेले होते. मात्र सद्य परिस्थितीत भाजपने (BJP), मोदी सरकारने त्यांची मदत केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृह मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री जयराम ठाकुर (CM Jairam Thakur) यांचे आभार व्यक्त करते. आज त्यांच्या घरी भेटीसाठी आलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधींकडे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपीच्या आघाडी महाराष्ट्र सरकार विरोधात कंगना रणौत विरोधात केलेल्या कारवाईविरोधात हल्लाबोल केला.

Published by: Meenal Gangurde
First published: September 10, 2020, 10:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading