डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणूक ते पवारांची पगडी, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

Sachin Salve
मुंबई, 19 जून : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 52 व्या वर्धापन दिनीनिमित्ताने झालेल्या मेळाव्यात चौफेर तोफ धडाडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पगडी आणि पीडीपीशी घेतलेल्या काडीमोडावर उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. त्यांच्या या भाषणातील हे ठळक मुद्दे....उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्देडिसेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता, तयार राहा

जीडीपीत वाढ म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोलमध्ये वाढमुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव, मुंबईचं महत्व कमी करून त्याला गुजरातचं उपनगर करण्याचा डाव - हायपरलूप आणि बुलेट ट्रेन म्हणजे वांझोटी स्वप्न- कोकणात नाणारची रिफायनरी होऊ देणार नाहीअखेर शिशिर शिंदेंची 'घरवापसी',कान धरून मागितली शिवसैनिकांची माफी- पगड्या घालून कोणी मोठे होत नाही,राजकारण करण्यासाठी तुमचं डोकं वापरा, दैवतांच्या पगड्या घालू नका - पगडीचं राजकारण करून मराठी माणसांमध्ये फुट पाडण्याचं काम सुरू आहे, उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर टीका- सरकारमधून केव्हा बाहेर पडायचं याचे सल्ले आम्हाला देवू नका, केव्हा काय करायचं हे शिवसेनेला माहित आहे, शिकवण्याची गरज नाही

जग संपलं, मोदी आता मंगळावर फिरायला जातील : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

- आघाड्यांमध्ये येण्याची निमंत्रणं शिवसेनेला येत आहेत, हे वाढलेल्या शक्तीचं प्रतिक- फक्त गायीला वाचवणं हा हिंदू धर्म नाही तर औरंगजेब सारख्या शहीद सैनिकाला मुजरा करणं हे हिंदुत्व

'स्वबळावर लढणार आणि जिंकणारही -आदित्य ठाकरे

- भाजप आसाममध्ये बांगलादेशच्या हिंदूंना आश्रय देण्याच्या तयारीत, पण त्या आडून अतिरेकी आले तर काय करणार? - रमझानमध्ये शस्त्रसंधी करता मग पाकिस्तान दिवाळी, गणपतीला कधी शस्त्रसंधी करते का?- सहाशे जवान शहीद झाल्यावर भाजपला कळलं राज्यातलं सरकार नालायक आहे म्हणून ?- मोदींना आता फक्त परग्रहावरच जायचं राहिलं

'शिवसेना पूर्ण सत्तेवर का नाही येऊ शकली याचा शोध घेतोय -मनोहर जोशी

- महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, आज सर्व देश शिवसेनेचं मत जाणून घ्यायला उत्सुक आहेत - इथं थापा मारून झालं, आता परग्रहावरही थापा मारतील- जिंकलो म्हणून कधी माजलो नाही, हरलो म्हणून कधी थांबलो नाही - विधानसभेवर भगवा फडकवणारच, उद्धव ठाकरेंचा पुन्हा स्वबळाचा नारा- उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भाषण पहा इथं

Trending Now