JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेशचा डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेशचा डोळ्यात पाणी आणणारा VIDEO

विलासराव देशमुख यांची आज 75 वी जयंती. रितेश याने वडिलांच्या आठवणीत एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 मे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज 75 वी जयंती आहे. विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश याने वडिलांच्या आठवणीत एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. रितेश देशमुख याने टीकटॉकवर ‘अभी मुझमे कही बाकी है जिंदगी’ या गाण्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख नेहमी जॅकेट आणि पांढरा कुर्ता असा पेहराव करायचे. रितेश यांनी आपल्या वडिलांच्या या ड्रेससोबत हा भावूक व्हिडिओ तयार केला आहे. तसंच, बाबा तुमची दररोज आठवण येते, असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. रितेशची ही पोस्ट पाहून अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले आहे.

रितेश देशमुख नेहमी वेगवेगळ्या मुलाखती आणि सोशल मीडियावर विलासराव देशमुख यांच्याबद्दल आठवणींना उजाळा देत असतात. आज विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यासह देशभरातील कार्यकर्त्यांनी विलासरावांना आदराजंली वाहिली आहे. तसंच विलासराव देशमुख याचे पूत्र आणि  मंत्री अमित देशमुख आणि  धीरज देशमुख यांनी वडिलांना आदरांजली अर्पण केली.

संबंधित बातम्या

विलासराव देशमुख यांच्या दृष्टी व धोरणामुळे महाराष्ट्राच्या जडणघडण होण्यास मदत मिळाली. एक मुलगा म्हणून मला तुमची नेहमी आठवण येते, अशी भावनिक पोस्ट धीरज देशमुख यांनी केली.

जाहिरात

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली आदरांजली ‘मुंबईत पायाभूत प्रकल्पांची उभारणी करताना, महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी स्वर्गीय देशमुख यांनी अविरत प्रयत्न केले. पुरोगामी, प्रगत महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं. महाराष्ट्राची सर्वसमावेशक प्रगती हे त्यांचं ध्येय होतं. त्यासाठी नियोजनबद्ध काम केलं. बाभळगावच्या सरपंचपदापासून राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचलेल्या, केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडलेल्या देशमुख यांनी प्रत्येक पदाला न्याय दिला. महाराष्ट्राच्या जनतेनं सोपवलेली जबाबदारी प्रत्येक वेळी यशस्वीपणे पार पाडली.

जाहिरात

राजकारण, समाजकारण, सहकार सर्वच क्षेत्रात त्यांनी आपलं कर्तृत्वं सिद्ध केलं. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांबद्दल जनतेच्या मनातलं प्रेम, आदर, आपुलकी चिरंतन आहे. सर्वसामान्य जनतेशी जुळलेलं नातं अतूट आहे. कृषी, उद्योग, अर्थ, सहकार, शिक्षण, आरोग्य सर्व क्षेत्रात महाराष्ट्राला त्यांनी पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवलं. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला. राजकारणात मतभेद असू शकतात. परंतु, मनभेद असू नयेत हा विचार रुजवला, वाढवला. महाराष्ट्रात वैचारिक देवाणघेवाणीची राजकीय संस्कृती निर्माण केली. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाचं एक स्वप्नं बघितलं होतं. त्यांच्या स्वप्नातली मुंबई, महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं प्रयत्नं करणं हीच त्यांना आदरांजली ठरेल’ संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या