नवी दिल्ली, 01 जून : अम्फान चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आदळ्ल्यानंतर दहा दिवसानंतर महाराष्ट्र आणि गुजरातसाठी हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील 48 तासात अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दोन्ही किनारपट्टीतील राज्यांना 3 जूनपर्यंत वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाचे संकेत आहेत. यामुळे अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे. आज (ता.1) कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, रविवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. तर सोमवारी सकाळी मुंबईत पावसाचं आगमन झाल्यानं मुंबईकर सुखावला आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. हवामान खात्यानं त्यांच्या दैनंदिन बुलेटिनमध्ये अरबी समुद्रात दोन वादळ तयार होत असल्याचं सांगितलं आहे. यातील एक आफ्रिकन किनाऱ्यापासून ओमान यमनच्या दिशेने जाईल तर दुसरं वादळ भारताजवळ सज्ज आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, अरबी समुद्राच्या आग्नेय-पूर्व-मध्य-प्रदेशात येत्या 48 तासांत कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. पुढील 48 तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. वायव्य दिशेकडे वाटचाल करीत हे वादळ जूनपर्यंत गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आदळेल. पुणेकरांसाठी कसा असेल लॉकडाऊन 5.0, या नियमांसह आज येणार नवा आदेश विशेष म्हणजे, 10 दिवसांपूर्वी, बंगालच्या उपसागरातून आलेल्या वादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये विनाश ओढवला. चक्रीवादळामुळे 86 लोक ठार झाले. त्याच वेळी, कोट्यवधी लोक बेघर झाले. त्यामुळे आताच्या चक्रीवादळाचा धोका बसू नये यासाठी राज्यांना ततर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीची भीती राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राचे प्रमुख सती देवी यांनी सांगितलं की, 4 जूनसाठी किनारपट्टीवरील महाराष्ट्र, गोवा आणि संपूर्ण गुजरातसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या वादळामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावरील महाराष्ट्र आणि गोव्यासाठी रेड अलर्ट आणि गुजरातसाठी ऑरेंज अलर्ट 3 जूनसाठी जारी करण्यात आला आहे. आयएमडीने ट्विट केलं आहे की, दक्षिणपूर्व व लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्र व लक्षद्वीप या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील 24 तासांच्या दरम्यान, तो पूर्व-मध्य आणि लगतच्या आग्नेय अरब अरबी समुद्रात बदल दिसेल आणि पुढील 24 तासांत ते चक्रीवादळ बनेल. आजपासून बदलणार तुमच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचे नियम, खिशाला बसणार कात्री?