पुणेकरांसाठी कसा असेल लॉकडाऊन 5.0, या नियमांसह आज येणार नवा आदेश

पुणेकरांसाठी कसा असेल लॉकडाऊन 5.0, या नियमांसह आज येणार नवा आदेश

इतर भागात सूट देण्यात आली असून त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवलेल्या आहेत. पुण्यातही लॉकडाऊन 5.0 साठी पुणे मनपा आयुक्त आज नव्याने ऑर्डर काढणार आहेत.

  • Share this:

पुणे, 01 जून : राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पाचवा टप्पा अवलंबवण्यात आला आहे. केंद्र सरकारने शनिवारी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही राज्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही नियमावली जाहीर केली. केंद्राने जारी केलेल्या नियमांप्रमाणेच राज्य सरकारकडूनही कंटेन्मेंट झोनमध्ये शिथिलता आणलेली नाही. मात्र इतर भागात सूट देण्यात आली असून त्यासाठी काही नियम आणि अटी ठेवलेल्या आहेत. पुण्यातही लॉकडाऊन 5.0 साठी पुणे मनपा आयुक्त आज नव्याने ऑर्डर काढणार आहेत.

नव्या आदेशानुसार आता प्रतिबंधित क्षेञातील अत्यावश्यक दुकानेही 4 तासांसाठी उघडणार येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या 21 तारखेपासून प्रतिबंधित क्षेञातील दुकानं बंद आहेत. ती उघण्याची परवाणगी जरी देण्यात आली असली तरी त्यासाठी वेगळे नियम आणि अटी असणार आहेत. काही ठराविक वेळेतच ही दुकानं उघण्यासाठी परवाणगी देण्यात येणार आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात प्रतिबंधित क्षेञातील जीवनावश्यक किट वाटपावर पालिकेचा 100 कोटींचा खर्च झाला आहे. पेशंट वाढल्यानं प्रतिबंधित क्षेञात धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सूट देण्याऐवजी काही नियम आणखी कठोर करण्यावर भर देणं आवश्यक आहे अशी माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी न्यूज18 लोकमतला दिली आहे.

आजपासून बदलणार तुमच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचे नियम, खिशाला बसणार कात्री?

दरम्यान, पुण्यात शहरातील कोरोना प्रतिबंधित क्षेञांची नव्याने फेररचना होणार आहे. तुळशीबागेतील दुकानंही सोशल डिस्टंट पाळून उघडी होणार आहेत. तर नेमके कोणत्या भागात काय नियम लागू होणार यावर आज नव्या ऑर्डर देण्यात येणार आहेत. खरंतर लॉकडाऊनचा पाचवा टप्पा लागू करण्यात आला असला तरी पुणे शहरात कोरोनाचा कहर सुरु आहे. मात्र, विभागातून दिलासादायक बातमी आहे. पुणे विभागात एका दिवसांत एकूण 5063 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या रुग्णांनी रविवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9749 आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण 4220 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 446 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 216 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोरोना आणि किडनीच्या आजारानं प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं निधन

संपादन - रेणुका धायबर

First published: June 1, 2020, 8:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading