JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / नवी मुंबईत राजकीय खळबळ, शिवसेना नेते विजय चौगुले यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

नवी मुंबईत राजकीय खळबळ, शिवसेना नेते विजय चौगुले यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

आरोपीकडून 50 लाखांच्या खडणीची मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याचीदेखील धमकी देण्यात आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी मुंबई, 29 फेब्रुवारी : नवी मुंबईतून राजकीय क्षेत्रातली एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना नेते , महाराष्ट्र वडार मंडळाचे अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा )आणि मनपा विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या बातमीमुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या तोंडावर अशा धमकी देण्यात आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून 50 लाखांच्या खडणीची मागणी करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर जीवे मारण्याचीदेखील धमकी देण्यात आली आहे. पत्र पाठवून खंडणीची धमकी दिल्याचं सांगण्यात येत आहे. या संदर्भात रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेना नेत्याला जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय चौगुले यांच्याबरोबर असलेले महिलांचे आक्षेपार्य फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देवून 50 लाख रूपये खंडणीची मागणी केली गेली आहे. इतर बातम्या - Delhi Violence: हिंसाचारात 630 जणांना घेतलं ताब्यात, रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त दरम्यान, फोटोंबाबत विचारलं असता माझे महिलांसोबत कोणतेही आक्षेपार्ह फोटो नसल्याचे स्पष्टीकरण विजय चौगुले यांच्याकडून देण्यात आलं आहे. तर निवडणूकीच्या तोंडावर राजकीय सुडबुध्दीतून धमकीचा प्रकार घडवत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणात रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या पत्राद्वारे चौगुलेंना खंडणीची धमकी देण्यात आली ते पत्रदेखील पोलिसांनी तपासणीसाठी घेतलं आहे. दरम्यान, याबद्दल अधिक माहिती काढण्यासाठी पोलीस चौगुले यांच्या कुटुंबाशी आणि कार्यकर्त्यांशी चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतर बातम्या - गर्भवती महिलेच्या पोटावर जमावाने घातल्या लाथा, बाळाच्या जन्मानंतर आई म्हणाली…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या