जाहिरात
मराठी बातम्या / देश / Delhi Violence: हिंसाचारात 630 जणांना घेतलं ताब्यात, रात्रभर पोलिसांचा चोख बंदोबस्त

Delhi Violence: हिंसाचारात 630 जणांना घेतलं ताब्यात, रात्रभर पोलिसांचा चोख बंदोबस्त

Delhi Violence: हिंसाचारात 630 जणांना घेतलं ताब्यात, रात्रभर पोलिसांचा चोख बंदोबस्त

हिंसाचाराचे आणखी प्रकार थांबवण्यासाठी दिल्ली पोलीस आणि पॅरा मिलिटरी फोर्सच्या सैनिकांनी रात्रीच्या वेळी हिंसाग्रस्त भागात गस्त घातली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 फेब्रुवारी : दिल्ली हिंसाचाराने गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांचा जीव घेतला. राजधानी दिल्लीतील जीवन आता हळूहळू आणि स्थिरतेने पुढे जात आहे. दुकाने उघडत आहेत, वाहने बाहेर येत आहेत. बाजारात हालचाली पाहायला मिळत आहेत. तर झालेल्या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार मृतांचा आकडा 41 वर पोहोचला आहे. हिंसाचाराचे आणखी प्रकार थांबवण्यासाठी दिल्ली पोलीस आणि पॅरा मिलिटरी फोर्सच्या सैनिकांनी रात्रीच्या वेळी हिंसाग्रस्त भागात गस्त घातली. मौजपूर, करावल नगर, भजनपुरा, सीलमपूर आणि झफरबाद अशा भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून अफवा टाळण्यासाठी पोलीस लोकांशी चर्चाही करतआहेत. ईशान्य दिल्लीतील या हिंसाचारात 200 हून अधिक लोक जखमी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ईशान्य दिल्लीतील या हिंसाचारात 123 एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 630 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे. इतर बातम्या - यंदाची उष्णता तोडणार सगळे रेकॉर्ड तर असा असेल मान्सून! शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिल्ली पोलीस हिंसाचारग्रस्त भागात अमन समितीची बैठक घेत आहेत. सोशल मीडियावर या मेसेजवर पोलिसांचे लक्ष आहे. खोटे आणि अफवा पसरवणारे मेसेज पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. कोणी खोटे मेसेज पाठवलेच तर त्यांच्यावर सायबर सेलचा निशाणा असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात